पेट्रोल पंपाजवळ नशेचा अड्डा! नेवरीत 15 नशेच्या इंजेक्शनच्या बाटल्यांसह 10 लाखांचा माल जप्त; चौघांना अटक!

Last Updated:

सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात नेवरी येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत गुंगीकारक नशेच्या इंजेक्शनचा साठा जप्त केला आहे. रविवार, 27 जुलै रोजी...

Crime News in Sangli
Crime News in Sangli
कडेगाव : सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यामधील नेवरी येथे पोलिसांनी एक मोठी कारवाई करत गुंगीकारक नशेच्या इंजेक्शनचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत दोन मोटारी, मोबाईल आणि इंजेक्शनच्या 15 बाटल्या असा एकूण 10 लाख 1 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी विटा शहरातील 4 संशयितांना अटक केली आहे.
हे आहेत संशयित आरोपी
रोहित हणमंत शिंदे (वय-23, रा. शाहुनगर, विटा), राजू विठ्ठल हरगुडे (वय-29, रा. विवेकानंद नगर, विटा), विशाल आनंदा चव्हाण (वय-28, रा. नेवरी नाका, विटा) आणि शुभम राजू भागवत (वय-28, रा. विटा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. ही कारवाई रविवार, दिनांक 27 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.
advertisement
नशेच्या 15 सीलबंद बाटल्या आढळल्या
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, नेवरी येथील विटा-पुसेसावळी रस्त्यालगत असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळील बंद पोल्ट्री शेडच्या परिसरात काही तरुण संशयास्पदरीत्या थांबले होते. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता, संशयित रोहित आणि राजू यांच्या ताब्यातील एका मोटारीमध्ये (एमएच 29 डीएफ 0895) नशेच्या 15 सीलबंद बाटल्या आढळून आल्या. या बाटल्या ते इतर दोन संशयित, विशाल आणि शुभम यांना विकण्यासाठी आणले होते, असे तपासात उघड झाले आहे.
advertisement
एकूण 10 लाखांचा ऐवज जप्त
या कारवाईत पोलिसांनी 'मेफेंटरमिन सल्फेट' या गुंगीकारक औषधाच्या सुमारे 4 हजार 410 रुपये किमतीच्या 15 बाटल्या, 6 लाख 50 हजार आणि 2 लाख 50 हजार रुपये किमतीच्या दोन मोटारी, तसेच 57 हजार रुपयांचे 4 मोबाईल असा एकूण 10 लाखांपेक्षा जास्त किमतीचा ऐवज जप्त केला आहे.
याप्रकरणी चौघांवर कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव आणि पोलीस हवालदार अमोल नागर यांच्या नेतृत्वाखालील पथक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. अटक केलेल्या चौघा संशयितांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना बुधवार, दिनांक 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
पेट्रोल पंपाजवळ नशेचा अड्डा! नेवरीत 15 नशेच्या इंजेक्शनच्या बाटल्यांसह 10 लाखांचा माल जप्त; चौघांना अटक!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement