IAS अधिकाऱ्याच्या मुलीने स्वत:ला संपवलं, 9 महिन्यापूर्वी केलं होतं लव्ह मॅरेज! हुंडाबळी प्रकरणाने खळबळ
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IAS Officer Daughter Dowry Harassment : रविवारी माधुरी बाथरूममधून बाहेर न आल्याने तिच्या कुटुंबातील सदस्यांनी दरवाजा तोडला असता ती लटकलेल्या अवस्थेत आढळली.
IAS Officer Daughter Ends Life : पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाने महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. अशातच आता एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय. आंध्र प्रदेशातील वरिष्ठ आयएएस अधिकारी चिन्ना रामुडू यांची 25 वर्षीय मुलगी (IAS Officer Daughter) माधुरी साहितीबाई हिने ताडेपल्ली येथे माहेरी घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप
रविवारी माधुरी बाथरूममधून बाहेर न आल्याने तिच्या कुटुंबातील सदस्यांनी दरवाजा तोडला असता ती लटकलेल्या अवस्थेत आढळली. प्राथमिक तपासात हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी माधुरीने तिचा पती राजेश नायडू याच्यावर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला होता.
advertisement
काही आठवड्यांपासून तणावाखाली
माधुरी आणि राजेश यांनी 5 मार्च 2025 रोजी लग्न केले होते आणि 7 मार्च रोजी कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबातील सदस्य तिला समजावण्याचा आणि भावनिक सांत्वन देण्याचा प्रयत्न करत होते, परंतु गेल्या काही आठवड्यांपासून ती खूप तणावाखाली होती, अशी माहिती मिळाली होती.
माझ्या मुलीला फोन करण्यासाठी...
advertisement
दरम्यान, आयएएस अधिकारी चिन्ना रामुडू म्हणाले की, राजेश त्यांच्या मुलीला हुंड्यासाठी त्रास देत होता. त्याने तिला धमकी दिली की, तिला कोणताही आधार नाही आणि तो तिला मारून टाकेल. माझ्या मुलीला फोन करण्यासाठीही त्याची परवानगी घ्यावी लागली. ती त्याच्यासोबत राहू शकत नव्हती, म्हणून आम्ही तिला घरी परत आणले, असं चिन्ना रामुडू म्हणाले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2025 11:06 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
IAS अधिकाऱ्याच्या मुलीने स्वत:ला संपवलं, 9 महिन्यापूर्वी केलं होतं लव्ह मॅरेज! हुंडाबळी प्रकरणाने खळबळ


