अयोध्येत महापाप...! राम मंदिरासमोर 'गेस्ट हाऊस कांड', तरुणाच्या मोबाईलमध्ये अंघोळ करणाऱ्या महिलांचे Video

Last Updated:

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या जवळच घडलेल्या घटनेमुळे खळबळ माजली आहे. राम जन्मभूमीच्या व्हीआयपी दर्शन मार्ग गेट नंबर 3 समोरच्या गेस्ट हाऊस कांडामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

अयोध्येत महापाप...! राम मंदिरासमोर 'गेस्ट हाऊस कांड', तरुणाच्या मोबाईलमध्ये अंघोळ करणाऱ्या महिलांचे Video
अयोध्येत महापाप...! राम मंदिरासमोर 'गेस्ट हाऊस कांड', तरुणाच्या मोबाईलमध्ये अंघोळ करणाऱ्या महिलांचे Video
अयोध्या : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या जवळच घडलेल्या घटनेमुळे खळबळ माजली आहे. राम जन्मभूमीच्या व्हीआयपी दर्शन मार्ग गेट नंबर 3 समोरच्या गेस्ट हाऊस कांडामुळे अनेकांना धक्का बसला आहे. सौरभ नावाच्या तरुणाला बाथरूममध्ये अंघोळ करणाऱ्या महिला भाविकांचे व्हिडिओ बनवताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. अंघोळ करत असताना एका महिलेने सौरभला व्हिडिओ बनवताना बघितलं, आणि तिने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडलं. पोलिसांना बहराइचमध्ये राहणाऱ्या सौरभच्या मोबाईलमधून अनेक अश्लिल फोटो आणि व्हिडिओ मिळाले आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता महिला भाविक गेस्ट हाऊसच्या बाथरूममध्ये अंघोळ करत होती, तेव्हा आरोपी सौरभची सावली तिला दिसली. सौरभ व्हिडिओ काढत असल्याचं महिलेला समजलं, हे पाहून घाबरलेली महिला किंचाळत बाथरूममधून बाहेर आली. महिलेचा आवाज ऐकून गेस्ट हाऊसमध्ये थांबलेले भाविकही बाहेर आले आणि त्यांनी पळत जाऊन आरोपीला पकडलं. भाविकांनीच आरोपी सौरभला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी सौरभच्या फोनची तपासणी केल्यानंतर त्याच्या फोनमध्ये अंघोळ करणाऱ्या महिलांचे 10 व्हिडिओ मिळाले.
advertisement

काय म्हणाली पीडित महिला?

'मी आंघोळ करत होते, तेव्हा अचानक माझं लक्ष एका सावलीकडे गेलं. कुणीतरी मोबाईलमधून माधा व्हिडिओ काढत असल्याचं दिसलं, हे पाहून मी घाबरले आणि कपडे घालून बाहेर आले', असं पीडित महिलेने सांगितलं आहे.
ज्या गेस्ट हाऊसमध्ये हा प्रकार घडला आहे, ते राम मंदिराच्या गेट नंबर 3 पासून 50 मीटर अंतरावर आहे. वाराणसीवरून काही भाविक राम मंदिरात दर्शनासाठी आले होते. संध्याकाळ झाल्यामुळे त्यांनी राम मंदिराच्या जवळच असलेल्या राजा गेस्ट हाऊसमधील 2 खोल्या बुक केल्या. यातल्याच एका महिलेचा व्हिडिओ सौरभने काढला. सध्या पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
मराठी बातम्या/क्राइम/
अयोध्येत महापाप...! राम मंदिरासमोर 'गेस्ट हाऊस कांड', तरुणाच्या मोबाईलमध्ये अंघोळ करणाऱ्या महिलांचे Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement