चिकनमुळे अक्रित घडलं, अख्खं कुटुंब रुग्णालयात दाखल; 3 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू
- Published by:Prachi Amale
- Reported by:Vijay Desai
Last Updated:
घरात पोलिसांना शिळा भात, वडा पाव खराब अवस्थेत मिळून आले आहेत. कुटुंबातील सहा पैकी पाच जणांना विषबाधा झाली आहे.
मुंबई : एकाच कुटुंबातील पाच जणांना अन्नातून विषबाधा होऊन त्यात तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मीरा भाईंदरमधील जय बजरंग नगर येथे ही घटना घडली आहे. या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. तर इतरांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.घटनेनंतर फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून घरातील खाण्याचे नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली याबाबतचे स्पष्ट होणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंबाने रविवारी रात्री चिकन बनवले होते. कुटुंबातील सहा जणांपैकी पाच जणांनी ते जेवण केले. जेवण केल्यानंतर काही वेळातच सर्वांची प्रकृती बिघडली. उलट्या, जुलाब आणि डोके गरगरणे यांसारखी लक्षणे दिसताच कुटुंबीयांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना विषबाधेची लक्षणे असल्याचे सांगत उपचार सुरू केले. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी कळवले.
advertisement
सहापैकी पाच जणांना विषबाधा
भाईंदर येथील रमेश मोर्या यांच्या कुटुंबातील नीलम मोर्या आणि राजकुमार मोर्या यांच्यावर मीरा भाईंदर मधील पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर चाहत मोर्या आणि अनामिका मोर्या यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे जे.जे. रुग्णालय, मुंबई येथे हलवण्यात आले आहे. रमेश मौर्या याला विषबाधा झाली नसून तो ताडीच्या नशेत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
advertisement
विषबाधेचे नेमके कारण अस्पष्ट
घरात पोलिसांना शिळा भात, वडा पाव, खराब अवस्थेत मिळून आले आहेत. विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट न झाल्यामुळे पोलिसांनी प्रकरण संशयास्पद मानून फॉरेन्सिक टीमला पाचारण केले आहे. या संपूर्ण घटनेचा तपास मीरा भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे करत आहेत.
कुटुंबीयांवर वैद्यकीय उपचार सुरू
advertisement
या प्रकरणाकडे पोलिस तपास करत असून या प्रकारचा गुन्हेगारी हेतू आहे का, हे तपासले जात आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या कुटुंबीयांवर वैद्यकीय उपचार सुरू असून सर्वजण आता धोक्याबाहेर आहेत. मात्र, या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल येईपर्यंत अन्नातून विषबाधा की षडयंत्र, याचा अंदाज लावणे योग्य ठरणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा :
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 08, 2025 5:03 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
चिकनमुळे अक्रित घडलं, अख्खं कुटुंब रुग्णालयात दाखल; 3 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू