Amravati : दोघात तिसरी आल्याचा संशय, मैत्रिणीने मैत्रिणीला बॉयफ्रेंडसमोरच संपवलं
- Published by:Suraj
Last Updated:
मित्रासोबत दुरावा निर्माण होण्याला मैत्रीण कारणीभूत असल्याच्या संशयातून तिने मैत्रिणीवर हल्ला केला.
अमरावती : अमरावतीत एका तरुणीने तिच्या मैत्रिणीची चाकूने भोसकून हत्या केल्याचं समोर आलंय. मित्रासोबत दुरावा निर्माण होण्याला मैत्रीण कारणीभूत असल्याच्या संशयातून तिने मैत्रिणीवर हल्ला केला. मंगळवारी रात्री ही घटना घडली. दस्तूरनगर सुपर एक्सप्रेस हायवेवर हा प्रकार घडला असून या घटनेनंतर तरुण आणि हल्ला करणारी तरुणी घटनास्थळावरून फरार झाले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आर्वी इथल्या शुभांगी हिची तिच्याच मैत्रिणीने हत्या केली. शुभांगी ही तिच्या मित्रासोबत एका मैत्रिणीकडे वाढदिवसासाठी गेली होती. तेव्हा तिघे मिळून सुपर एक्सप्रेस हायवेवर फिरायला गेले. तेव्हा सूरज देशमुख हा मित्र तिथं आला. तो शुभांगीला आधीपासून ओळखत होता. सूरज आणि त्याच्या मैत्रिणीमध्ये झालेले गैरसमज शुभांगीच्या उपस्थितीत दूर करायचे होते. त्यासाठी ते बोलत होते.
advertisement
शुभांगीसोबत बोलत असताना अचाकन त्यांच्यात वाद झाले. सूरजची मैत्रीण तिथे पोहोचली. तेव्हा शुभांगीमुळे सूरजसोबत दुरावा निर्माण झाला असा समज मैत्रिणीला झाला आणि त्यांच्यात वाद झाला. शेवटी वाद विकोपाला गेला आणि मैत्रिणीने चाकू खिशातून काढून शुभांगीच्या गळ्यावर वार केले.
वार वर्मी लागल्यानं शुभांगी जागेवरच कोसळली. शुभांगी रक्ताच्या थारोळ्यात पडली असताना तिच्यासोबत आलेल्या दोघांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं पण उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला होता. तर शुभांगीवर हल्ला करणारी मैत्रिण आणि सूरज हे घटनास्थळावरून पळून गेले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 09, 2024 1:44 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Amravati : दोघात तिसरी आल्याचा संशय, मैत्रिणीने मैत्रिणीला बॉयफ्रेंडसमोरच संपवलं


