CRPF जवानाने ASI गर्लफ्रेंडला संपवलं, 11 तास मृतदेहासमोर बसून राहिला अन्... अंगावर काटा आणणारी घटना!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
CRPF Jawan Finished ASI Lover : मृत अरुणा जाधव या अंजार पोलीस स्टेशनमध्ये एएसआय म्हणून कार्यरत होत्या, तर त्यांचा पार्टनर दिलीप जाधव हा केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (CRPF) जवान असून, तो मणिपूरमध्ये तैनात होता.
CRPF Jawan Finished women ASI Lover : प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं म्हणतात. पण माणसाचा संताप एवढ्या टोकाला जाईल की प्रेमाचा जीव घुटमळला जाऊ शकतो. याचीच प्रचिती देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या 25 वर्षीय महिला सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) अरुणा जाधव यांची त्यांच्याच लिव्ह-इन पार्टनरने, एका सीआरपीएफ जवानाने, शुक्रवारी रात्री वाद विकोपाला गेल्यानंतर गळा आवळून हत्या केली. या क्रूर कृत्यानंतर आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला, परंतु तो वाचला आणि शनिवारी सकाळी अंजार पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. नेमकं काय झालं? पाहा
लवकर करणार होते लग्न पण...
मृत अरुणा जाधव या अंजार पोलीस स्टेशनमध्ये एएसआय म्हणून कार्यरत होत्या, तर त्यांचा पार्टनर दिलीप जाधव हा केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (CRPF) जवान असून, तो मणिपूरमध्ये तैनात आहे. सुरेंद्रनगर जिल्ह्यातील शेजारच्या गावांचे रहिवासी असलेले हे दोघे दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते आणि लवकरच लग्न करण्याचं त्यांनी ठरवलं होतं. अरुणा या लखतर तालुक्यातील डेरवाला गावच्या, तर दिलीप लिंबडी तालुक्यातील टोकरला गावचा रहिवासी आहे.
advertisement
दिलीपचा आत्महत्येचा प्रयत्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही सुट्टीवर होते आणि शॉपिंग तसेच छोट्या सुट्टीसाठी अहमदाबादला गेले होते. कच्छ पूर्वचे पोलीस अधीक्षक, सागर बागमार यांनी या घटनेबद्दल बोलताना सांगितले, "वादाच्या भरात जाधवने अरुणाचा गळा आवळून खून केला. आपण काय केले याची जाणीव झाल्यावर, त्याने चाकूने मनगट कापून आणि फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्याला उलटी झाली आणि तो वाचला."
advertisement
मृतदेहाजवळ 11 तास बसला
ही भयानक घटना अंजारमधील गंगोत्री सोसायटीतील एका भाड्याच्या घरात घडली, जिथे हे जोडपे राहत होते. शेजाऱ्यांनी शुक्रवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास दोघांमध्ये मोठा वाद ऐकल्याचे सांगितले. आरोपी शनिवारी सकाळी 10 वाजेपर्यंत मृतदेहासोबत होता. त्यानंतर शनिवारी सकाळी दिलीप जाधव अंजार पोलीस स्टेशनमध्ये चालत गेला आणि त्याने खुनाची कबुली दिली.
advertisement
आरोपी ताब्यात
अंजार पोलीस निरीक्षक अजयसिंग गोहिल यांनी सांगितलं की, "दिलीपच्या कबुलीजबाबामुळे आम्हाला अरुणाच्या मृत्यूची माहिती मिळाली. आम्ही तात्काळ त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला. आम्ही पीडितेच्या कुटुंबियांना कळवले आहे आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. या हत्येकडे नेणाऱ्या घटनाक्रमाचा आम्ही तपास करत आहोत." या घटनेने परिसरात आणि पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
Location :
Gujarat
First Published :
July 20, 2025 11:53 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
CRPF जवानाने ASI गर्लफ्रेंडला संपवलं, 11 तास मृतदेहासमोर बसून राहिला अन्... अंगावर काटा आणणारी घटना!