15 झोपेच्या गोळ्या देऊनही नवरा मरेना, दिराला विचारलं, 'मरण्यासाठी किती वेळ करंट द्यावा?', इन्स्टाग्राम चॅट अन् खुनाचा उलघडा!

Last Updated:

Delhi Crime News : पत्नी सुष्मिताने नवऱ्याला 12 जुलैच्या रात्री करणच्या अन्नात सुमारे 15 झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या. मात्र, त्याचा अपेक्षित परिणाम झाला नाही.

Delhi Delhi Crime NewsCrime News
Delhi Delhi Crime NewsCrime News
Delhi Crime News : दिल्लीच्या द्वारका परिसरातील उत्तमनगरमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे. एका विवाहित महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा निर्घृण खून केल्याचे समोर आले असून, या गुन्ह्याचा पर्दाफाश 90 हून अधिक इन्स्टाग्राम मेसेजमुळे झाल्याचे पोलिसांनी रविवारी सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे, या गुन्ह्यातील आरोपी प्रियकर हा मृताचाच चुलतभाऊ आहे.

चुलत दिरासोबत अनैतिक संबंध

करण देव (३६) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्याची पत्नी सुष्मिता आणि प्रियकर राहुल यांना पोलिसांनी अटक केली आहे. सुष्मिताचे गेल्या दोन वर्षांपासून करणचा चुलत भाऊ राहुलसोबत अनैतिक संबंध होते. करणच्या भावाने यापूर्वीच सुष्मिता आणि राहुल यांच्यातील संबंधांबद्दल संशय व्यक्त केला होता. त्यानंतर, पोलिसांनी तपास सुरू केला असता काही धक्कादायक बाबी समोर आल्या.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुष्मिताने 12 जुलैच्या रात्री करणच्या अन्नात सुमारे 15 झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या. मात्र, त्याचा अपेक्षित परिणाम झाला नाही. त्यानंतर, तिने राहुलला मेसेज पाठवून याबाबत माहिती दिली. एका मेसेजमध्ये सुष्मिताने लिहिले होते, "इतक्या गोळ्या देऊनही काहीच होत नाही, आता करंटच द्यावा लागेल." यावर राहुलने प्रत्युत्तर दिले, "त्याचे हात-पाय टेपने बांधून मग करंट दे." यानंतर सुष्मिताने राहुलला "करण मरण्याइतपत करंट किती वेळ द्यावा लागेल?" असा प्रश्न विचारल्याचे समोर आले, ज्यातून त्यांच्या क्रूर कटाची भीषणता स्पष्ट होते.
advertisement
दरम्यान, 13 जुलै रोजी करणचा मृत्यू झाल्याची माहिती माता रूपाराणी रुग्णालयाकडून पोलिसांना देण्यात आली होती, तेव्हापासून या प्रकरणाला वेगळे वळण लागले. सुष्मिता आणि राहुल यांच्यातील इन्स्टाग्रामवरील संभाषणाने पोलिसांच्या संशयाला अधिक बळ मिळाले आणि या खुनाचा कट स्पष्ट झाला.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
15 झोपेच्या गोळ्या देऊनही नवरा मरेना, दिराला विचारलं, 'मरण्यासाठी किती वेळ करंट द्यावा?', इन्स्टाग्राम चॅट अन् खुनाचा उलघडा!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement