Dhule Crime News : फुगा फुगवताना तोंडातच फुटला, 8 वर्षाच्या डिंपलने काही क्षणातच जीव गमावला
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Dhule Crime News : अंगणात खेळत असताना एका 8 वर्षीय चिमुकलीचा दु्र्दैवी अंत झाला. एक फुगा चिमुकली डिंपलचे प्राण घेण्यास कारणीभूत ठरला असल्याची माहिती समोर आली.
धुळे : अंगणात खेळत असताना एका 8 वर्षीय चिमुकलीचा दु्र्दैवी अंत झाला. एक फुगा चिमुकली डिंपलचे प्राण घेण्यास कारणीभूत ठरला असल्याची माहिती समोर आली. अंगणात खेळत असताना फुगा फुगवताना तोंडातच फुटला. त्यानंतर श्वास अडकून डिंपल वानखेडे या 8 वर्षीय चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेने वानखेडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. डिंपलच्या दुर्देवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
धुळ्यातील यशवंत नगरमध्ये ही घटना घडलीय. . फुगा फुगवताना अचानकच तोंडातच तो फुटला. रबरी फुगा तोंडात फुटल्यानं त्या फुग्याचे तुकडे श्वासनलिकेत अडकल्याने आठ वर्षांच्या चिमूकलीला जीव गमवावा लागला. श्वास घेण्यास त्रास होतोय हे लक्षात येताच घरच्यांनी तिला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी मुलीस तपासून मृत घोषित केले. आठ वर्षीय डिंपल आपल्या अंगणात खेळत असताना फुगा फुगवताना झालेल्या या दुर्घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
advertisement
मुंबई हादरली, 4 वर्षांच्या मुलाचं अपहरण करून हत्या
4 वर्षांच्या मुलाचं अपहरण करून त्याची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडली आहे. मुंबईच्या कांदिवली पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. अटक केलेला आरोपी मुलाच्या सावत्र वडिलांचा मित्र आहे, त्याच्याविरोधात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना संशयित आरोपीची ओळख पटवण्यास मदत झाली.
Location :
Dhule,Maharashtra
First Published :
March 27, 2025 12:00 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Dhule Crime News : फुगा फुगवताना तोंडातच फुटला, 8 वर्षाच्या डिंपलने काही क्षणातच जीव गमावला