जळगाव: दारूच्या नशेत नवरा पिसाळला, चावा घेत पत्नीच्या बोटाचा पाडला तुकडा, मेहुण्यालाही बदडलं
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime News: जळगावात एका व्यक्तीने दारुच्या नशेत आपल्या पत्नीच्या बोटाचा जबरी चावा घेतला आहे. यात पत्नीचं बोट नखासह तुटलं आहे.
विजय वाघमारे, प्रतिनिधी जळगाव: दारू माणसाला कोणत्या थराला नेईल, याचा कुणीच अंदाज घेऊ शकत नाही. जळगावच्या कुसुंबा गावात घडलेली घटना याचं जिवंत उदाहरण आहे. येथील एका पतीने दारूच्या नशेत आपल्या पत्नीच्या हाताच्या बोटाला जबरी चावा घेतला आहे. हा चावा इतका भयंकर होता की पत्नीचं बोट नखासकट तुटून पडलं. पतीच्या या राक्षसी कृत्यानं संपूर्ण गाव हादरल आहे.
जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात दारूच्या नशेत पतीने पत्नीवर हल्ला केला. आरोपी पतीने तिच्या हाताच्या बोटाचा तुकडा तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्रीकृष्ण नगर येथील खंडेराव पाटील यांनी पत्नी सोनीबाईसोबत रात्री वाद घालताना तिच्या उजव्या हाताला चावा घेतला. चावा इतका जोरदार होता की करंगळीच्या बाजूचे बोट नखासकट तुटून पडले.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी पीडितेचा पती खंडेराव आणि भाऊ ईश्वर यांच्यात वाद सुरू होता. यावेळी दारुच्या नशेत असलेल्या खंडेरावने आपल्या मेहुण्याला बेदम मारहाण केली. यावेळी सोनीबाई आपला भाऊ ईश्वरला वाचवण्यासाठी भांडणात पडल्या.
advertisement
यावेळी खंडेरावने सोनीबाई यांच्यावरच अमानुष हल्ला केला. त्याने पत्नीच्या बोटाचा चावा घेत, थेट नखासकट बोटाचा तुकडा पाडला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खंडेराव पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Apr 19, 2025 1:40 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
जळगाव: दारूच्या नशेत नवरा पिसाळला, चावा घेत पत्नीच्या बोटाचा पाडला तुकडा, मेहुण्यालाही बदडलं










