Video : '...हे पण पापा की परीला घाबरतात'; हत्तीने केलेला प्रकार पाहून, नेटकऱ्यांमध्ये उठली चर्चा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अचानक हत्तीला पाहून महिला काही क्षणांसाठी थबकतात. हा हत्तीचा कळप देखील आहे महिलेला पाहून थांबतो पण मग महिलेला पळताना पाहून मग कळप देखील तेथून निघून जातो.
मुंबई : सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यांपैकी काही व्हिडीओ हे मनोरंजनाशी संबंधीत असतात. तर काही व्हिडीओ हे प्राण्यांशी संबंधीत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. जो प्राण्यांशी संबंधीत आहे . भारतातील रस्त्यांवर तु्म्ही प्राणी आल्याचे पाहिलं असेल. ज्यामुळे कधी लोकांना पळ काढावा लागतो तर कधी प्राणी माणसांना पाहून घाबरतात. पण या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असं काही दिसत आहे, जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
या व्हिडिओमध्ये हत्तींचा एक मोठा कळप रस्त्याने जात असताना दिसतो. त्याच वेळी समोरून स्कूटीवरून दोन मुली येताना दिसतात. अचानक हत्तीला पाहून महिला काही क्षणांसाठी थबकतात. हा हत्तीचा कळप देखील आहे महिलेला पाहून थांबतो पण मग महिलेला पळताना पाहून मग कळप देखील तेथून निघून जातो.
या गोंधळात हत्ती समोर आलेल्या महिलेसोबत एक विचित्र प्रकार घडला. हत्तीला पाहून आता काय करु? गाडी मागे घ्यायला वेळ नाही, मग पुढे जाऊ का? अशा गोंधळात अखेर या स्कूटी चालवणाऱ्या महिलेनं आपली स्कूटी तशीच रस्त्यावर सोडली आणि हत्ती समोर पळ काढला. व्हिडीओत पुढे पाहून तुम्हाला वाटेल की आता या महिलेची स्कूटी गेली कामातून, कारण एकदा का त्यावर हत्तीने पाय दिला, मग मात्र त्याचं नुकसान झालंच. पण पुढे घडलेला प्रसंग वेगळा होता.
advertisement
हत्तीच्या पायाखाली महिलेची स्कुटी होती, पण त्या स्कुटीवर पाय न ठेवता हत्ती तिच्या बाजूने हळूच निघाला. ज्यामुळे स्कुटीचं नुकसान झालं नाही. तर या सगळ्यात दुसरी एक महिला स्कूटी एका कारच्या मागे लपवते आणि कारचा फायदा घेत पळ काढण्याचा प्रयत्न करते.. हत्तींचा कळप मात्र घाईघाईत तिथून निघून जातो. हा प्रसंग पाहून लोक सोशल मीडियावर मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.
advertisement
Even elephants get scared when they see a girl riding a scooter. 😅#GirlPower #Elephants pic.twitter.com/Oa5oRif0N6
— ಸನಾತನ (@sanatan_kannada) September 8, 2025
एका युजरने लिहिले, “हत्ती कदाचित चकित झाले असतील की कोणी त्यांना घाबरत नाहीये!” तर दुसऱ्याने विनोदाने म्हटले, “जर हत्ती सुद्धा स्कूटीवाल्या महिलांना घाबरत असतील, तर आपण माणसं काय चीज आहोत?”
advertisement
या व्हिडिओला आतापर्यंत 36 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. कमेंट सेक्शन मजेदार प्रतिक्रियांनी भरला आहे. काहींनी तर हसत लिहिले, “स्कूटीचा हॉर्न हत्तींचा खरा शत्रू आहे. त्यांनाही माहीत आहे की या जोडीशी (स्कूटर आणि मुलगी) पंगा घ्यायचा नाही.”
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2025 6:12 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Video : '...हे पण पापा की परीला घाबरतात'; हत्तीने केलेला प्रकार पाहून, नेटकऱ्यांमध्ये उठली चर्चा