CRIME : मुख्याध्यापकाच्या केबिनमध्येच शिक्षिकेने स्वत:ला संपवलं, अडीच वर्षांपासून सुरू होता छळ! दरवाजाची कडी पाहून भावाला वेगळाच संशय

Last Updated:

Teacher Ends Life in principal cabin : शिक्षकांच्या सततच्या त्रासाला कंटाळून एका शिक्षिकेने मुख्याध्यापकाच्या कॅबिनमध्ये स्वत:ला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Female Govt School Teacher Ends Life in principal cabin
Female Govt School Teacher Ends Life in principal cabin
Teacher Ends Life in principal cabin : एका ठिकाणहून दुसर्‍या ठिकाणी ट्रान्सफर घेणं किती कठीण असतं हे शिक्षकांशिवाय दुसरं कुणी समजू शकत नाही. त्यात शिक्षकांचं काम म्हणजे 12 गावचं पाणी प्यायला लागतं. कधी इलेक्शन तर कधी नोदंणी... अशातच आता एक काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर आली आहे. हरख विकासखंड अंतर्गत येणाऱ्या उदवापूर कंपोजिट स्कूलमध्ये एका महिला शिक्षिकेने शाळेतील प्रिन्सिपल रूममध्ये गळफास लावून आपलं आयुष्य संपवलं. शनिवारी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचं वातावरण असून, एका शिक्षिकेने शाळेच्या आवारातच इतकं टोकाचं पाऊल का उचललं, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

शिक्षण विभागात मोठी खळबळ

मृतक महिला या शाळेत सहायक शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. ही घटना उघडकीस येताच शिक्षण विभाग आणि पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली. सतरिख पोलीस स्टेशनच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. या शिक्षिकेला 2 मुले असून त्यांचे पतीदेखील शिक्षण विभागातच दुसऱ्या एका शाळेत सहायक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
advertisement

बदलीसाठी प्रयत्न करत होत्या, पण...

या प्रकरणात मृत शिक्षिकेच्या पतीने शाळेतील इतर स्टाफवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, गेल्या अडीच वर्षांपासून शाळेतील काही कर्मचारी त्यांच्या पत्नीला सतत मानसिक त्रास देत होते. जेव्हा त्या मनापासून विद्यार्थ्यांना शिकवायच्या, तेव्हा इतर कर्मचारी त्यांच्यावर टोकाची टीका-टिप्पणी करायचे. या त्रासामुळे त्या बदलीसाठी प्रयत्न करत होत्या, मात्र त्यात यश मिळाले नाही, असे त्यांच्या पतीने सांगितले आहे.
advertisement

खोलीचा दरवाजा आतून बंद नव्हता - भाऊ

मृत महिलेच्या भावाने या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. ज्या खोलीत फाशी घेतली, त्या खोलीचा दरवाजा आतून बंद नव्हता, असा दावा त्यांनी केला असून शाळेतील काही शिक्षकांची नावे घेत त्यांना जबाबदार धरले आहे. "मोठी शिकवणारी आली, हिला काय अवॉर्ड हवाय का?" अशा शब्दांत इतर कर्मचारी त्यांची छेड काढत असत, असा आरोप कुटुंबाने केला आहे. गेल्या अडीच वर्षापासून तिचा छळ सुरू होता, अशी माहिती मिळाली आहे.
advertisement

घटनेच्या दिवशीच फोन झाला... 

दरम्यान, घटनेच्या दिवशी सकाळी 10.30 च्या सुमारास पत्नीशी फोनवर बोलणं झालं होतं, तेव्हा त्या फारशा चिंतेत वाटत नव्हत्या, असं पतीने नमूद केलं. तसेच, शाळेतील सहकाऱ्यांनी त्यांना लटकलेल्या अवस्थेत पाहिलं असूनही वेळेवर हॉस्पिटलमध्ये का नेलं नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. जर वेळीच मदत मिळाली असती, तर कदाचित आज त्यांची पत्नी जिवंत असती, अशी खंत पतीने व्यक्त केली आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
CRIME : मुख्याध्यापकाच्या केबिनमध्येच शिक्षिकेने स्वत:ला संपवलं, अडीच वर्षांपासून सुरू होता छळ! दरवाजाची कडी पाहून भावाला वेगळाच संशय
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement