आधी भिंतीवर डोकं आपटलं, मग गळ्यावर केला वार, संशयामुळे पार्टनर बनला सैतान; कराड हादरलं!
- Published by:Arjun Nalavade
 
Last Updated:
Karad Crime : पतीच्या निधनानंतर निता जाधव या आपल्या मुलांना घेऊन आयुष्य जगत होत्या. त्या एका इलेक्ट्राॅनिक्स दुकानात काम करत होत्या. काम करत असताना...
कराड (सातारा) : पतीच्या निधनानंतर निता जाधव या आपल्या मुलांना घेऊन आयुष्य जगत होत्या. त्या एका इलेक्ट्राॅनिक्स दुकानात काम करत होत्या. काम करत असताना त्यांनी ओळख शैलेंद्र नामदेव शेवाळे याच्यासोबत झाली. 2007 पासून निता आपल्या मुलांना घेऊन शैलेंद्रसोबत कोयना वसाहतीत राहत होत्या.
अशी घडली घटना
18 सोबत राहिल्यानंतर शैलेंद्र निता यांच्यावर चारित्र्यावरून संशय घेऊ लागला. त्यांना मारहाण करू लागला. दिवसेंदिवस हा वाद वाढतच चालला. सोमवारी दुपारी कपडे वाळत घालत असताना शैलेंद्रच्या डोक्यात संशयाचं भूत शिरलं आणि त्याने मारहाण सुरू केली. त्यांचं डोकं भिंतीवर आदळलं, इतकंच नाहीतर त्यांच्या गळ्यावर चाकून वार केले. इथेच तो थांबला नाहीतर निता यांना खोलीत कोंडून निघून गेला.
advertisement
पार्टनवर गुन्हा दाखल
जखमी अवस्थेतही निता यांना मुलांना फोन केला आणि घडलेली घटना सांगितली. मुलांना त्वरीत त्यांच्या आईला रुग्णालयात हालवले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. निता यांनी दिलेल्या तक्रारीवरून शैलेंद्र यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा : खून की आत्महत्या? भुवईवर जखम, गळ्यावर व्रण; 'त्या' तरुणाचा मृत्यू कशामुळे? पोलिसांना तर वेगळाच संशय...
advertisement
हे ही वाचा : साताऱ्यात चाललंय काय? 2 मिनिटांत 3 चोरट्यांनी केला कांड, माॅर्निंग वाॅकवेळी महिलेसोबत घडली धक्कादायक घटना! 
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 26, 2025 11:42 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
आधी भिंतीवर डोकं आपटलं, मग गळ्यावर केला वार, संशयामुळे पार्टनर बनला सैतान; कराड हादरलं! 


