नववीच्या मुलीवर शाळेतल्या चार पोरांकडून सामूहिक अत्याचार, घरी कुणी नसताना जबरदस्तीने घरात घुसले अन्...

Last Updated:

Crime News: एका नववीत शिकणाऱ्या मुलीवर तिच्याच वर्गातील चार अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

News18
News18
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात महिला आणि लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. अलीकडेच पश्चिम बंगालमध्ये कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर कॉलेज कॅम्पसमध्ये लैंगिक अत्याचार केला होता. आरोपींनी पीडित तरुणीला जबरदस्तीने ओढत नेत अत्याचार केला होता. अत्याचार करणाऱ्यांमध्ये आजी माजी विद्यार्थ्यांसह कॉलेजच्या स्टाफचा देखील समावेश होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण देशात याचे पडसाद उमटले.
हे प्रकरण ताजं असताना आता एका नववीत शिकणाऱ्या मुलीवर तिच्याच वर्गातील चार अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित चार मुलांनी पीडित मुलीच्या घरी जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबाद याठिकाणी घडली. पीडित मुलगी इयत्ता नववीच्या वर्गात शिकते. घटनेच्या दिवशी रविवारी ती घरी एकटीच होती. यावेळी शाळकरी मुलांनी तिच्या घरी जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. अत्याचार करणारी मुलं देखील तिच्याच शाळेत शिकतात.
याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, रविवारी पीडित मुलगी घरात एकटी होती. ती सोशल मीडियाद्वारे शाळेतील मुलाच्या संपर्कात होती. रविवारी सकाळी एक आरोपी तिच्या घरी पोहोचला. या मुलीने घराचा दरवाजा उघडताच मुख्य आरोपी मुलासह त्याचे आणखी तीन साथीदार जबरदस्तीने घरात शिरले, तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्याचवेळी मुलीची आई घरी आली. तिने मुलीला घराबाहेर काढले आणि घराला बाहेरून कुलूप लावून मुलांना कोंडून ठेवले. मात्र, पोलिसांना बोलावण्यापूर्वीच सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून त्या मुलांना सोडून दिले. आरोपी मुलंही इयत्ता नववी, दहावी, अकरावीमध्ये शिकत आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
नववीच्या मुलीवर शाळेतल्या चार पोरांकडून सामूहिक अत्याचार, घरी कुणी नसताना जबरदस्तीने घरात घुसले अन्...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement