पती सोडून गेला, पत्नीला बसला धक्का, घरात झोपवंल बाळाला आणि घेतला टोकाचा निर्णय!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याचा अंत्यविधी आणि सावडण्याचा कार्यक्रम आटपल्यानंतर त्याची पत्नी घरी आली. पण पती गेल्याचं दुःख...
कडा (बीड) : पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याचा अंत्यविधी आणि सावडण्याचा कार्यक्रम आटपल्यानंतर त्याची पत्नी घरी आली. पण पती गेल्याचं दुःख सहन झालं नाही. पत्नीने आपल्या तान्हा बाळाला घरात झोपवलं आणि घराजवळ असणाऱ्या विहिरीत उडी घेऊन तिनेही आत्महत्या केली. ही घटना आष्टी तालुक्यातील खिळद येथे गुरुवारी सकाळी घडली.
पतीन केली होती आत्महत्या
समोर आलेली माहिती अशी की, नंदू नागरगोजे आणि त्याची पत्नी स्वाती नागरगोजे यांचा विवाह काही दिवसांपूर्वीच झाला होता. ते पुण्यातील शेवाळवाडी येथे राहत होते. स्वाती गर्भवती होती, त्यामुळे ती आई-वडिलांकडे आली होती. तिने नुकताच बाळाला जन्मही दिला होता. पण 4 दिवसांपूर्वीच पती नंदूने पुण्यातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
advertisement
पत्नीनेही संपवलं स्वतःला
पतीच्या जाण्याने फार मोठा धोका पत्नी स्वातीला बसला होती. पतीचा अत्यंविधी झाल्यानंतर स्वाती घरी आले. पण पतीचा मृत्यू तिला सहन झाला नाही, तिने आपल्या तान्ह्या बाळाला घरी झोपवले आणि गुरूवारी पहाटे घराजवळ्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आले, मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनसाठी रुग्णालयात पाठवला.
advertisement
हे ही वाचा : Satara News: 'लिंक ओपन केली अन्...', गटशिक्षणाधिकाऱ्याची उडाली झोप, लागला 'इतक्या' लाखांचा चुना!
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 15, 2025 2:59 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
पती सोडून गेला, पत्नीला बसला धक्का, घरात झोपवंल बाळाला आणि घेतला टोकाचा निर्णय!








