'I am Sorry, माझ्या मृत्यूला...', विद्यापीठातील वसतिगृहात विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य, दोघांवर आरोप करत लिहिली शेवटची चिठ्ठी!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sharda University Student Death Case : ज्योतीने आपल्या सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, जर माझा मृत्यू झाला, तर यासाठी पीसीपी (Pre-Clinical Pathology) आणि डेंटल कोर्सचे शिक्षक जबाबदार असतील.
Sharda University Student Death Case : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. येथील शारदा युनिव्हर्सिटीमध्ये बीडीएस (बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी) द्वितीय वर्षात शिकणाऱ्या ज्योती नावाच्या विद्यार्थिनीने गर्ल्स हॉस्टेल 'मंडेला'मध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये आणि परिसरात खळबळ उडाली आहे. तिने सुसाईड नोट लिहित दोघाजणांना गुन्हेगार धरलं आहे.
घटनास्थळी सुसाईड नोट
माहिती मिळताच नॉलेज पार्क कोतवाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. महत्त्वाचे म्हणजे, पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट मिळाली असून, त्यात विद्यार्थिनीने आपल्या शिक्षकांवर छळाचा गंभीर आरोप केला आहे.
माझा अपमान केला, शिक्षकांनी...
मिळालेल्या माहितीनुसार, ज्योतीने आपल्या सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, "जर माझा मृत्यू झाला, तर यासाठी पीसीपी (Pre-Clinical Pathology) आणि डेंटल कोर्सचे शिक्षक जबाबदार असतील. मला त्यांना तुरुंगात पाहायचे आहे. त्यांनी मला मानसिकदृष्ट्या खूप त्रास दिला. त्यांनी माझा अपमान केला. त्यांच्यामुळे मी बऱ्याच काळापासून तणावात होते. त्यांनाही हेच सहन करावे लागो, अशी माझी इच्छा आहे.", असं तरुणीने अखेरच्या चिठ्ठीत लिहिलंय.
advertisement
विद्यापिठात राडा, चौकशी सुरू
दरम्यान, एका मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी युनिव्हर्सिटीमधील काही जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. या घटनेची सखोल चौकशी सुरू असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
Location :
Uttar Pradesh
First Published :
July 19, 2025 2:35 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
'I am Sorry, माझ्या मृत्यूला...', विद्यापीठातील वसतिगृहात विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य, दोघांवर आरोप करत लिहिली शेवटची चिठ्ठी!