Crime : मैत्रिणीच्या खोलीमध्ये घुसला, बेडवरच्या टेडीसोबत घृणास्पद कृत्य, भारतीय विद्यार्थ्याने देशाची लाज घालवली!

Last Updated:

विद्यार्थिनीच्या खोलीत घुसून अश्लिल कृत्य केल्याप्रकरणी इंग्लंडमधल्या भारतीय विद्यार्थ्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. नॉर्थम्ब्रिया विद्यापीठात सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असलेल्या उत्कर्ष यादव याने गैरकृत्याची कबुली दिली आहे.

मैत्रिणीच्या खोलीमध्ये घुसला, बेडवरच्या टेडीसोबत घृणास्पद कृत्य, भारतीय विद्यार्थ्याने देशाची लाज घालवली!
मैत्रिणीच्या खोलीमध्ये घुसला, बेडवरच्या टेडीसोबत घृणास्पद कृत्य, भारतीय विद्यार्थ्याने देशाची लाज घालवली!
मुंबई : विद्यार्थिनीच्या खोलीत घुसून अश्लिल कृत्य केल्याप्रकरणी इंग्लंडमधल्या भारतीय विद्यार्थ्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. नॉर्थम्ब्रिया विद्यापीठात सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असलेल्या उत्कर्ष यादव याने गैरकृत्याची कबुली दिली आहे, त्यानंतर त्याला शिक्षा सुनावली गेली आहे.
उत्कर्ष यादव याने विद्यापीठातच शिकत असलेल्या त्याच्या सहकारी विद्यार्थिनीच्या खोलीत घुसून तिचं बेड कव्हर आणि टेडी बेअरवर हस्तमैथुन केल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये विद्यार्थिनी जेव्हा घरी गेली होती, तेव्हा ही घटना घडली. उत्कर्ष यादवने जिम की कार्ड वापरून विद्यार्थिनीच्या खोलीमध्ये अनधिकृतरित्या प्रवेश केला होता.
विद्यार्थिनीच्या खोलीमध्ये गेल्यानंतर उत्कर्ष यादवने बेड कव्हर आणि तीन जेलीकॅट डेटी बेअरवर हस्तमैथुन केलं. जानेवारी महिन्यात विद्यार्थिनी परत आली तेव्हा तिला तिच्या बेडवर आणि खेळण्यांवर डाग दिसले, असं वृत्त एक्सप्रेसने दिलं आहे.
advertisement
कायदेशीर कारवाई दरम्यान उत्कर्ष यादवने सुरूवातीला कोणतीही टिप्पणी देण्यास नकार दिला, पण बेड कव्हर आणि टेडी बेअरवरच्या डागांची डीएनए टेस्ट केल्यानंतर सत्य समोर आलं आणि त्यानंतर उत्कर्ष यादवने केलेल्या कृत्याची कबुली दिली.
उत्कर्षने गुन्हा कबूल केल्यानंतर त्याच्या 14 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आली. म्हणजेच उत्कर्ष पुढील दोन वर्षांमध्ये जोपर्यंत दुसरा गुन्हा करत नाही तोपर्यंत तो तुरुंगवास भोगणार नाही. याशिवाय उत्कर्ष यादवला 200 तास विनावेतन समाजकार्य करावं लागणार आहे, तसंच पुनर्वसन कार्यक्रमांनाही उपस्थित राहावं लागणार आहे. तसंच नुकसान झालेल्या वस्तूंसाठी त्याला 117 पाऊंड नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.
advertisement
उत्कर्ष यादव दोषी आढळल्यानंतर नॉर्थम्ब्रिया विद्यापीठाने की कार्डची चूक त्वरित दुरुस्त केली आणि उत्कर्षला वेगळ्या निवासस्थानामध्ये हलवले. तसंच विद्यापीठ निलंबित करण्याचा विचारही करत आहे. याशिवाय त्याचा व्हिसा रद्द झाला तर त्याला भारतात परत पाठवले जाण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Crime : मैत्रिणीच्या खोलीमध्ये घुसला, बेडवरच्या टेडीसोबत घृणास्पद कृत्य, भारतीय विद्यार्थ्याने देशाची लाज घालवली!
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement