Crime News : ट्रॉली बॅगमध्ये आढळला चिमुकलीचा मृतदेह! हत्येला अनैतिक संबंधाची किनार? घटनेनंतर आई बेपत्ता
- Published by:Rahul Punde
- trending desk
Last Updated:
Crime News : प्रियकराशी असलेल्या अनैतिक संबंधांमुळे आईनंच हे कृत्य केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय.
मुझफ्फरपूर : बिहारमधल्या मुझफ्फरपूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना उघड झाली आहे. एका घराच्या मागच्या बाजूला फेकलेल्या ट्रॉली बॅगमध्ये बेपत्ता असलेल्या साडेतीन वर्षांच्या मुलीचा मृतदेह मिळाला. तिच्या आईनंच मुलीला मारल्याचा व नंतर ती प्रियकरासोबत पळून गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
मुझफ्फरपूरमधल्या साडेतीन वर्षांच्या मुलीच्या हत्येमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मिठनपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या रामबाग एफसीआय गोदामाच्या मागे असलेल्या भागात ही घटना घडली आहे. मनोजकुमार यांची मुलगी मिष्टीकुमारी असं हत्या झालेल्या मुलीचं नाव आहे. तिची गळा दाबून हत्या करण्यात आली व मग मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरून ती बॅग फेकून देण्यात आली. मुलीची आई काजलकुमारी ही शुक्रवारी (23 ऑगस्ट) दुपारी दोन वाजल्यापासून बेपत्ता आहे. प्रियकराशी असलेल्या अनैतिक संबंधांमुळे आईनंच हे कृत्य केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय. घरातून बाहेर जाताना ती तिचे दागिने, आधार कार्ड अशा महत्त्वाच्या गोष्टीही घेऊन गेली आहे.
advertisement
मिष्टीचे मडील मनोजकुमार आणि मामा करणकुमार त्याच घरात राहत होते. ते शुक्रवारी त्यांच्या कामानिमित्ताने बाहेर गेले होते. दुपारी दोन वाजता काजलकुमारी त्याच बिल्डिंगमध्ये तळमजल्यावर राहणाऱ्या नातेवाईकांना मावशीकडे वाढदिवसासाठी जायचं असल्याचं खोटं कारण सांगून घरातून बाहेर पडली. रात्री घरी येण्यास उशीर होईल असंही तिनं सांगितलं. त्यामुळे नातेवाईकांनी फारसं लक्ष दिलं नाही. तिचा मोबाइलही शुक्रवार दुपारपासून बंद आहे. मनोज व करण रात्री कामावरून घरी आल्यावर त्यांना गेट बंद असलेलं दिसलं. घरात काजल व मिष्टीही दिसल्या नाहीत. त्यांनी रात्रभर दोघींना शोधलं; मात्र त्या सापडल्या नाहीत. अखेर सकाळी नऊ वाजता त्यांनी दोघी बेपत्ता झाल्याची तक्रार मिठानपुरा पोलीस ठाण्यात नोंदवली.
advertisement
वाचा - सापाच्या वादातून पती-पत्नीला बेदम मारहाण! पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू
घटनेची माहिती मिळताच तिथे खूप गर्दी उसळली. पोलीसही थोड्या वेळात दाखल झाले. पोलिसांना शोधाशोध करताना घराच्या मागे असलेल्या खड्ड्यात पडलेली एक बॅग दिसली. बॅगची तपासणी केली असता त्यात मिष्टीचा मृतदेह आढळून आला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. बेपत्ता झालेल्या काजल कुमारीचा शोध सीसीटीव्ही फुटेज व टॉवर लोकेशनवरून घेतला जात असल्याचं मिठानपुरा पोलीस ठाण्यातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. फॉरेन्सिक विभागाकडून तपासणी केली जात आहे. संपूर्ण घराची तपासणी केली जाणार असून मुलीची हत्या घरात झाली असेल, तर रक्ताचे नमुने सापडतील असा पोलिसांचा अंदाज आहे.
advertisement
मुलीची आईही त्याच दिवसापासून बेपत्ता असल्याचं तिच्यावरच संशयाची सुई जाते आहे. तसंच कुटुंबीयांनीही आईवरच मुलीच्या हत्येचा आरोप केला आहे.
Location :
Bihar
First Published :
August 26, 2024 10:54 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News : ट्रॉली बॅगमध्ये आढळला चिमुकलीचा मृतदेह! हत्येला अनैतिक संबंधाची किनार? घटनेनंतर आई बेपत्ता