VIDEO: भारतीय तरुणाचा फ्लाइटमध्ये मोठा कांड, सीटवरून उठला अन् गळा दाबला, रक्ताळलेल्या चेहऱ्याने घेतली सेल्फी
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime News: फ्लाईटमधून प्रवास करताना एका भारतीय तरुणाने शेजारी बसलेल्या तरुणावर जीवघेणा हल्ला केला. त्याने सीटवरून उठत सहप्रवाशाचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला.
अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे राहणाऱ्या २१ वर्षीय इशान शर्माला विमानात मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही घटना फ्रंटियर एअरलाइन्सच्या फिलाडेल्फियाहून मियामीला जाणाऱ्या विमानात घडली. विमान उड्डाण करताच, ईशानने त्याच्या शेजारी बसलेल्या कीनू इव्हान्सवर कोणतेही कारण नसताना हल्ला केला. मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर, ईशानला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनाकारण हल्ला
मिडिया वृत्तानुसार, विमानातच ईशान आणि कीनूमध्ये हाणामारी झाली. या भांडणात ईशानचा डोळा सुजला आणि त्याच्या भुवयाला दुखापत झाली. कीनूच्या चेहऱ्यावरही ओरखडे पडले. या संपूर्ण भांडणाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, एक प्रवासी ओरडतो- "त्याला जाऊ द्या, त्याला सोडा," तर क्रू मेंबर्स म्हणत होते- "सर, तुम्हाला बसावे लागेल." व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की विमान हवेत असताना दोघांमध्ये राडा सुरू आहे.
advertisement
हेही वाचा- आत्याला धोका, मामाशी लफडं, सोनमपेक्षा डेंजर निघाली औरंगाबादची गुंजा, पतीला दिला भयंकर मृत्यू
“तू क्षुद्र आहेस, मला खुन्नस दिली तर खल्लास करेन”
या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना केनू इव्हान्सने सांगितलं की, विमानाने उड्डाण घेताच ईशान विचित्र वागू लागला. तो अचानक विचित्रपणे हसायला लागला आणि धमक्या देऊ लागला. इव्हान्स म्हणाला, “तो म्हणत होता की, तू एक क्षुद्र माणूस आहेस. तू मला खुन्नस दिली तर तुला मरावं लागेल’.
advertisement
हेही वाचा- जळगावची गायत्री पाटील निघाली 'कातील', अपहरण, 2 लाखांत विक्री अन् जबरदस्ती विवाह प्रकरणाला वेगळं वळण
गळा दाबण्याचा प्रयत्न केला, नंतर स्वतःला वाचवले
इव्हान्सने पुढे सांगितले की, जेव्हा इशानचे वर्तन अधिक विचित्र झाले. तेव्हा त्याने फ्लाइट क्रूला अलर्ट केलं. क्रूने सांगितले की जर असे पुन्हा घडले तर अलर्टचं बटण दाबा. काही वेळाने, ईशान पुन्हा त्याच्या समोर आला आणि इव्हान्सच्या कपाळाला हात लावून त्याला धमकावू लागला. नंतर त्याने इव्हान्सचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला.
advertisement
Ishaan Sharma, 21, was arrested and charged with battery after the incident on a flight bound for Miami, Florida #frontier #southflorida #arrest pic.twitter.com/rUuRVpE7v9
— American Crime Stories (@AmericanCrime01) July 2, 2025
हेही वाचा- Mumbai: मद्यधुंद असल्याचं पाहून साधला डाव, अलिबागमध्ये ऑफिस पार्टीत तरुणीवर अत्याचार
चेहरा रक्ताने माखल्या नंतर सेल्फी काढला
advertisement
मारामारीनंतर ईशान त्याच्या जागेवर परतला आणि विचित्रपणे हसू लागला. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याने त्याच्या रक्ताने माखलेल्या चेहऱ्यासह सेल्फी देखील काढला. हे विमान मियामीला पोहोचल्यानंतर पोलिसांनी हातकडी लावून त्याला विमानातून खाली उतरवले.
view commentsLocation :
Delhi
First Published :
July 04, 2025 12:37 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
VIDEO: भारतीय तरुणाचा फ्लाइटमध्ये मोठा कांड, सीटवरून उठला अन् गळा दाबला, रक्ताळलेल्या चेहऱ्याने घेतली सेल्फी


