Jalgaon Crime: दोघांचेही घटस्फोट, इन्स्टावरून प्रेम झालं पण घरच्यांचा लग्नाला विरोध; जोडप्याची बाळासह आत्महत्या
- Published by:Prachi Amale
Last Updated:
राजेंद्रची काही महिन्यांपूर्वीच इंस्टाग्राम वरून बारामती येथील विवाहिता राधिका ठाकरे या महिलेशी ओळख झाली.
विजय वाघमारे, प्रतिनिधी
जळगाव : जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातल्या पारधाडे रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर एक पुरुष महिला व तीन वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला होता. मात्र रेल्वेखाली आल्याने तिघांचेही मृतदेह छिन्न विच्छिन्न झाले होते. त्यामुळे मृतांची ओळख पटवण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर निर्माण झाले होते. मात्र या तीनही मृतदेहांची ओळख पटली असून भातखंडे खुर्द तालुका पाचोरा येथील रहिवासी राजेंद्र मोरे तसेच बारामती येथील राधिका ठाकरे व तिचा तीन वर्षाचा मुलगा सारंग अशी मृतांची ओळख पटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
advertisement
राजेंद्र मोरे व राधिका ठाकरे यांनी तीन वर्षाच्या मुलगा सारंगसह अयोध्या सुपरफास्ट एक्सप्रेस खाली झोकून देत आत्महत्या केल्याचेही स्पष्ट झाले आहे. प्रेम प्रकरणातून राजेंद्र मोरे व राधिका ठाकरे यांनी तीन वर्षाच्या मुलासह आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. विवाहित असलेला राजेंद्र मोरे याची पत्नी काही दिवसांपूर्वी कौटुंबिक वादातून माहेरी निघून गेलेली होती. त्यानंतर राजेंद्रची काही महिन्यांपूर्वीच इंस्टाग्राम वरून बारामती येथील विवाहिता राधिका ठाकरे या महिलेशी ओळख झाली. थोड्याच दिवसात दोघांचे प्रेम बहरले. त्यानंतर राजेंद्र याने बारामती येथे जात राधिकाला आपल्यासोबत पाचोरा येथे आणले.
advertisement
विचाराने समाज मन सुन्न
काही दिवस सोबत राहिल्यानंतर दोघांनाही एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु राजेंद्र आणि राधिका यांच्या दोघां कुटुंबीयांचा लग्नाला विरोध असल्यामुळे राजेंद्र आणि राधिकाने आत्महत्येचा निर्णय घेतला. मुलाला एकटं कसं सोडायचं या विवंचनेत असलेल्या राधिकाने आत्महत्या करताना मुलालाही सोबत घेतले. मयत मुलगा हा राधिकाच्या बारामती येथील पहिल्या पतीचा मुलगा होता. दरम्यान, या सर्व प्रकरणात मयत बालक सारंग चा काय दोष होता?, विचाराने समाज मन सुन्न झाले आहे
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
May 06, 2025 9:24 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Jalgaon Crime: दोघांचेही घटस्फोट, इन्स्टावरून प्रेम झालं पण घरच्यांचा लग्नाला विरोध; जोडप्याची बाळासह आत्महत्या


