मध्यरात्री तरूण करत होता अश्लील काॅल, महिलेने लाजेखातर सहन केला त्रास, पण जेव्हा पाणी डोक्यावरून गेलं...

Last Updated:

एका 30 वर्षीय महिलेला बिहारचा रहिवासी असलेल्या युवकाने मध्यरात्री वारंवार फोन करून अश्लील बोलणे व जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी...

Obscene call case
Obscene call case
एका तरुण 30 वर्षीय महिलेला मध्यरात्री वारंवार फोन करून तिच्याशी अश्लील भाषेत बोलला आणि तिने नकार दिल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी दिली. सुरुवातीला महिलेने समाजाच्या भीतीने ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही, पण जेव्हा तरुणाचे फोन वाढले, तेव्हा ती त्रस्त झाली आणि तिने पोलिसात तक्रार दाखल केली. छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात घडला.
वारंवार समजावून सांगून नाही ऐकलं
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुबोध कुमार सिन्हा हा बिहारचा रहिवासी असून कोरबा येथील रविशंकर नगरमध्ये भाड्याच्या घरात राहतो. तो पातरी येथे असलेल्या अदानी पॉवर प्लांटमध्ये काम करतो. आरोपीला पीडितेचा नंबर तिसऱ्या व्यक्तीकडून मिळाला होता. त्यानंतर तो तिला सतत फोन करून त्रास देत होता. मुलीने त्याला अनेकवेळा समजावले, पण आरोपीने त्याचे कृत्य थांबवले नाही.
advertisement
पोलीस घेताहेत शोध
अखेरीस, त्रस्त झालेल्या मुलीने माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत अदानी पॉवर प्लांटमधून आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध अश्लील बोलणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे या आरोपांखाली कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, पीडितेचा नंबर आरोपीला कोणी आणि का दिला, याचाही शोध घेत आहेत.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
मध्यरात्री तरूण करत होता अश्लील काॅल, महिलेने लाजेखातर सहन केला त्रास, पण जेव्हा पाणी डोक्यावरून गेलं...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement