कारमध्ये कोंबलं अन् बीडला आणलं, महिलेकडून तरुणाचं अपहरण, पोलिसांना टीप मिळाली अन्...

Last Updated:

Crime in Beed: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्येची ही घटना ताजी असताना बीडच्या धारूर तालुक्यात असाच काहीसा प्रकार उघडकीस आला आहे.

News18
News18
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: काही दिवसांपूर्वी बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची अमानुष हत्या करण्यात आली होती. सुदर्शन घुले गँगनं देशमुखांचं अपहरण केलं. त्यांना बेदम मारहाण करत त्यांचा जीव घेतला. हत्येची ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली. अपहरण आणि हत्येची ही घटना ताजी असताना बीडच्या धारूर तालुक्यात असाच प्रकार उघडकीस आला आहे.
हे अपहरण दुसरं तिसरं कुणी नव्हे, तर एका महिलेनं केल्याचं समोर आलं आहे. संबंधित महिलेनं दोन पुरुषांच्या मदतीने हिंगोलीतून एका व्यक्तीचं अपहरण केलं होतं. तिघेहीजण अपहरण झालेल्या व्यक्तीला कारमध्ये कोंबून धारूरच्या दिशेनं घेऊन जात होते. पण पोलिसांना टीप मिळाल्याने मोठा अनर्थ टळला आहे. काही घातपात घडायच्या आत पोलिसांनी हे अपहरणकांड उधळून लावलं आहे. पोलिसांनी संबंधित व्यक्तीची सुटका करत महिलेसह दोन पुरुषांना बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
advertisement

नेमकं प्रकरण काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, बळीराम सावंत नावाच्या व्यक्तीचं हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील जवळा बाजार परिसरातील तिघांनी अपहरण केलं होतं. धारूर तालुक्यातील एका महिलेसह दोघांनी हे अपहरण केले होते. ते सावंत यांना एका कारमधून धारूरकडे घेऊन जात असताना तेलगाव येथे दिंद्रुड पोलिसांच्या पथकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने कार थांबवत बळीराम सावंत यांची सुटका केली.
advertisement
यावेळी पोलिसांनी एका महिलेसह दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता नागराबाई तोंडे या महिलेच्या सांगण्यावरून पैशांच्या व्यवहारातून नामदेव घोळवे आणि बाबुराव बडे या दोघांनी बळीराम सावंत यांचे अपहरण केल्याचे समोर आले. याबाबतची माहिती औंढा नागनाथ पोलिसांना दिल्यानंतर, तेथील पथक दिंद्रुड येथे दाखल झालं. पोलिसांनी आरोपींसह अपहरण झालेल्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. या घटनेचा अधिक तपास औंढा नागनाथ पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
कारमध्ये कोंबलं अन् बीडला आणलं, महिलेकडून तरुणाचं अपहरण, पोलिसांना टीप मिळाली अन्...
Next Article
advertisement
BJP Eknath Shinde : मोठी बातमी! भाजप-शिंदे गटातील वाद शमला, महापालिका निवडणुकीत महायुतीची घोषणा
मोठी बातमी! भाजप-शिंदे गटातील वाद शमला, महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र
  • मोठी बातमी! भाजप-शिंदे गटातील वाद शमला, महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र

  • मोठी बातमी! भाजप-शिंदे गटातील वाद शमला, महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र

  • मोठी बातमी! भाजप-शिंदे गटातील वाद शमला, महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र

View All
advertisement