Ajab Gajab : बारच्या टॉयलेटमध्ये गेली व्यक्ती, अचानक झाली गायब, 57 वर्षानंतर उलघडलं गुढ सत्य

Last Updated:

एके दिवशी संपूर्ण कुटुंब बारमध्ये गेले होते, तेव्हा एक सदस्य टॉयलेटमधून अचानक गायब झाला. त्याच्याबद्दल काहीही माहिती कुटुंबियांना नंतर मिळाली नाही

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : सायन्स आता बरंच पुढे गेलं आहे, पण असं असलं तरी कधीकधी अशा काही गोष्टी घडतात ज्याचं उत्तर सायन्सकडे ही नसतं. असंच एक प्रकरण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. विचार करा की तुम्ही कुठे पार्टिला गेला आहेत आणि तुमच्या सोबत असलेली व्यक्ती टॉयलेमध्ये गेली आणि पुन्हा परतलीच नाही? हे ही गोष्ट थोडी विचित्र आणि संशयास्पद नक्कीच आहे. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत घडलं.
एके दिवशी संपूर्ण कुटुंब बारमध्ये गेले होते, तेव्हा एक सदस्य टॉयलेटमधून अचानक गायब झाला. त्याच्याबद्दल काहीही माहिती कुटुंबियांना नंतर मिळाली नाही. जे त्यांच्यासाठी धक्कादायक होते. पण नंतर तब्बल 57 वर्षांनंतर त्यांना त्या व्यक्तीशी संबंधित असे एक सत्य कळते, ज्याबद्दल सर्वजण आश्चर्यचकित होतात.
डेली स्टार न्यूज वेबसाइटनुसार, हे प्रकरण इंग्लंडमधील डर्बीशायरमधील आहे. जानेवारी 1967 मध्ये, 54 वर्षीय अल्फ्रेड स्विंस्को नेहमीप्रमाणे दारू पिण्यासाठी त्यांच्या परिसरातील एका पबमध्ये गेले होते. तो खाणीत काम करायचा. तो बारच्या टॉयलेटमध्ये गेला पण गूढपणे गायब झाला. त्यानंतर तो कधीच भेटला नाही. अनेक लोकांचा असा विश्वास होता की तो माणूस पत्नी आणि 6 मुलांना सोडून कुठेतरी निघून गेला.
advertisement
56 वर्षांनंतर समोर आलं मृत्यूचं गुढ
खरंतर 2012 मध्ये त्याचे अल्फ्रेड स्विंस्को याचे निधन झाले. त्याचा पुतण्या आणि नातू रसेल त्यावेळी फक्त 4 वर्षांचे होते. त्यांना वाटले की आपल्या आजोबांचे सत्य आपल्याला कधीच कळणार नाही. पण गेल्या वर्षी 2023 मध्ये रसेलला एक गोष्ट समोर आली ज्यामुळे त्याला धक्काच बसला.
सोर्स : सोशल मीडिया
advertisement
सोर्स : सोशल मीडिया
सोशल मीडिया ब्राउझ करत असताना, त्याला अचानक पोलिसांनी पोस्ट केलेला एक फोटो समोर आला, ज्यामध्ये असे सांगण्यात आले की जवळच्या गावात, शेतात एक मृतदेह पुरलेला आढळला. रसेलने मृतदेहाचे मोजे पाहिले तेव्हा तो चक्रावून गेला. तेच मोजे आजोबा घालायचे आणि रसेलही ते मोजे पायात घालायचा प्रयत्न करायचा.
advertisement
डीएनए चाचणीसाठी रसेल तातडीने त्या गावात पोहोचला. निकाल आल्यावर सगळं सत्य समोर आलं. खरंतर तो मृतदेह त्याचे आजोबा अल्फ्रेडचा होता. शवविच्छेदनात समोर आले की शरीराच्या चेहऱ्यावर आणि जबड्यावर जखमा होत्या, याचा अर्थ मृत्यूपूर्वी त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्याचा पाठीचा कणाही तुटला होता. लोकांचा असा विश्वास आहे की ज्या ठिकाणी त्या माणसाला ठार मारून दफन करण्यात आले होते ते ठिकाण त्या काळात समलैंगिकता हा गुन्हा मानला जात असे. यामुळे, अल्फ्रेडने असे काहीतरी पाहिले असावे, जे लपवण्यासाठी लोकांनी त्याची हत्या केली असा अनेकांचा अंदाज होता.
advertisement
कुटुंबाने नंतर अल्फ्रेडची राख त्यांच्या मुला आणि मुलीच्या कबरीजवळ पुरली. त्याच्या मृत्यूमध्ये संशयित असलेल्या दोघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांचे मारेकरी काही सापडले नाहीत.
मराठी बातम्या/क्राइम/
Ajab Gajab : बारच्या टॉयलेटमध्ये गेली व्यक्ती, अचानक झाली गायब, 57 वर्षानंतर उलघडलं गुढ सत्य
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement