ऑनलाईन जीवनसाथी निवडला, तोच निघाला ठग, IT तल्या तरुणीला गंडा, कारनामे पाहून सारेच चक्रावले
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Marriage Fraud: ऑनलाईन जीवनसाथी निवडणं आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या मुंबईतील तरुणीला चांगलंच महागात पडलंय. त्याचे कारनामे पाहून पोलिसही चक्रावले आहेत.
मुंबई : सध्याच्या काळात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. केवळ सर्वसामान्यच नाही तर अगदी उच्चशिक्षित देखील याचे बळी ठरतात. असाच काहीसा प्रकार मुंबईत घडला असून एक आयटीत काम करणारी 29 वर्षीय तरुणीची फसवणूक झालीये. संकेतस्थळावरून निवडलेल्या भावी जीवनसाथीने तिला लग्नाचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घातला आहे. विशेष म्हणजे त्याने आणखीही काही तरुणींची फसवणूक केली असून त्याचे कारनामे पाहून सर्वांनाच धक्का बसलाये.
भांडुप परिसरात राहणारी 29 वर्षीय तरुणीही आयटी क्षेत्रात काम करते. तिने ऑनलाईन विवाह नोंदणी केली होती. 1 मार्च रोजी नबिल मुनिर खान याने पाठवलेली रिक्वेस्ट तिने स्वीकारली. फास्ट फूडची फ्रेंचाईजी, दक्षिण आफ्रिकेत मायनिंगचा व्यवसाय, डोंगरीत वडील ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करतात, असं तिला सांगण्यात आलं.
advertisement
कसे उकळले पैसे?
नबिल खान याने वेगवेगळ्या कारणांनी तरुणीकडून पैसे उकळले. स्वतःचे बँक खाते फ्रीज झाल्याचे सांगत तरुणीला ठाण्यातील सेकंडहँड मोटारसायकल डिलरला सव्वा लाख रुपये देण्यास सांगितले. त्यानं व्हाइट गोल्ड टाकून नवीन चेन बनवण्यासाठी तरुणीकडून दीड तोळ्याची चेन घेतली. पुढे अलिबागला फिरायला जात तेथेही त्याने तरुणीकडून एक लाखाचा मोबाईल घेतला. त्यानंतर मामाला कॅन्सर झाल्याचे सांगत अजून एक लाख रुपयांना गंडा घातला.
advertisement
पोलिसांमुळे समजली फसवणूक
दोघांचं सगळं सुरुळीत असतानाच 19 मार्च रोजी नबिलला पोलिसांनी चौकशीसाठी नेल्याचे तरुणीला कळले. त्यानंतर डीएन नगर पोलीस ठाण्यात गेल्यावर नबिलने आणखी एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून फसवल्याचे समजले. त्यानंतर तरुणीला तिची फसवणूक झाल्याचे समजले. तसेच तो अशाच प्रकारे तरुणींना जाळ्यात ओढून फसवणूक करत असल्याची खात्री झाली आणि नबिल खान विरोधात भांडुप पोलिसांत गुन्हा नोंदवला.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 29, 2025 9:54 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
ऑनलाईन जीवनसाथी निवडला, तोच निघाला ठग, IT तल्या तरुणीला गंडा, कारनामे पाहून सारेच चक्रावले







