'किंग कोब्रा'च्या जीवाशी खेळ! सोशल मीडिया पोस्टमुळे फुटलं बिंग, साताऱ्यातील तरुणांचा 'नको तो उद्योग' आला अंगलट

Last Updated:

Satara Crime : कर्नाटक राज्यातील कोडगू येथे किंग कोब्रासोबत बेकायदेशीरपणे फोटोशूट करून पैसे कमावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. साताऱ्यातील दोन तरुणांनी...

Satara Crime
Satara Crime
Satara Crime : सोशल मीडियावरील प्रसिद्धी आणि पैशांसाठी दुर्मिळ वन्यजीवांच्या जीवाशी खेळण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नाटक राज्यातील कोडगू येथे एका दुर्मिळ किंग कोब्राला बेकायदेशीरपणे बंदिवासात ठेवून त्याच्यासोबत फोटोशूट करत पैसे कमावणाऱ्या एका रॅकेटचा कर्नाटक वनविभागाने पर्दाफाश केला आहे. या गंभीर प्रकरणात सातारा जिल्ह्यातील दोन तरुणांसह एकूण चौघांवर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मीडिया पोस्टमुळे फुटले बिंग
या प्रकरणाचा छडा एका सोशल मीडिया पोस्टमुळे लागला. साताऱ्यातील दोन तरुणांनी दोन किंग कोब्रासोबतचे आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. हे फोटो वनविभागाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सखोल तपास सुरू केला. तपासात असे उघड झाले की, या चौघांनी मिळून दुर्मिळ सापांना फोटो आणि व्हिडिओसाठी वापरले. त्यांच्याकडून किंग कोब्रा हाताळला जात असल्याचे स्पष्ट पुरावे वनविभागाला मिळाले आहेत. या प्रकरणी महाराष्ट्रातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यासाठी कर्नाटक वनविभागाने शेजारील राज्याची मदत मागितली आहे.
advertisement
कायद्याचे उल्लंघन आणि शिक्षेची तरतूद
किंग कोब्रा हा अत्यंत दुर्मिळ आणि संरक्षित साप आहे. वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 नुसार कोणत्याही वन्यजीवाला पकडणे, त्याला बंदिवासात ठेवणे आणि प्रदर्शनासाठी वापरणे हा गंभीर गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी दोषी आढळल्यास तीन ते सात वर्षांच्या तुरुंगवासाची कठोर शिक्षा होऊ शकते. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात किंग कोब्रा केवळ सावंतवाडी-दोडामार्ग परिसरातच आढळतो. असे असतानाही साताऱ्यातील तरुणांकडे त्याचे फोटो सापडल्याने वन्यजीव कार्यकर्त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
advertisement
लाईक्ससाठी वन्यजीवांचा छळ
या घटनेवर बोलताना साताऱ्याचे मानद वन्यजीव वॉर्डन रोहन भाटे म्हणाले, "सोशल मीडियावर लाईक्स आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी दुर्मिळ सापांचा छळ केला जात आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून तो थांबवणे अत्यावश्यक आहे." तज्ज्ञांच्या मते, वनविभागाने अधिक सतर्क राहून अशा प्रकरणांवर लक्ष ठेवण्यासाठी आपल्या सायबर सेलची मदत घ्यायला हवी, जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसेल.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
'किंग कोब्रा'च्या जीवाशी खेळ! सोशल मीडिया पोस्टमुळे फुटलं बिंग, साताऱ्यातील तरुणांचा 'नको तो उद्योग' आला अंगलट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement