डॉक्टर मुलीनेच केली विधवा आईची फसवणूक, अडीच कोटींना गंडा, पुण्यातील प्रकार
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Pune Crime: पुण्यात पोटच्या लेकीनेच विधवा आईची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. 81 वर्षीय आईची अडीच कोटींना गंडा घातला आहे.
पिंपरी: मुलांसाठी आई-वडील पडेल ते कष्ट करतात. परंतु, उतारवयात काही मुले याच आई-वडिलांना घराबाहेर काढतात. आता हे प्रकार नवे राहिलेले नाहीत. पुण्यातील पिंपरीत एका डॉक्टर मुलीने स्वत:च्या विधवा आईची फसवणूक केल्याची घटना घडलीये. मुलगी आणि जावयाने 81 वर्षीय आईचे दिल्लीतील घर विकून ते पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तसेच आईला विविध कारणे सांगत तिच्याकडून 2 कोटी 58 लाख 82 हजार रुपये घेत तिची आर्थिक फसवणूक केली. पिंपळे सौदागर येथे 1 जानेवारी 2012 ते 1 जून 2024 या कालावधीत ही घटना घडली.
क्लिनिकसाठी मागितले पैसे
मुलीने क्लिनिक खरेदीकरिता आईला '40 लाख रुपये दे, मी तुला त्यात हिस्सा देते' असे सांगून पैसे घेतले. त्याच पैशातून रहाटणी येथे दुकान विकत घेतले. त्या दुकानात आईने स्वतःचे पैसे गुंतवले असताना तिला कोणताही हिस्सा न देता तसेच तिचे पैसे परत न करता फसवणूक केली. आईची दोन कोटी 58 लाख 82 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
advertisement
10 डिसेंबर 2012 रोजी मुलगी आणि जावयाने बन्सल प्लाझा येथील दुकान खरेदीसाठी नेऊन ते तुझ्या नावावर करून देऊ, असे सांगून 18 लाख 82 हजार रुपये धनादेशाद्वारे आणि 40 लाख रुपये रोख असे 58 लाख 82 हजार रुपयांना दुकान खरेदी केले. परंतु, ते दुकानही आईच्या नावावर न करता तिच्याकडून त्या दुकानाची पूर्ण किंमत घेतली.
advertisement
मुलगी व जावयावर गुन्हा
पिंपळे सौदागर येथील 81 वर्षीय वृद्ध महिलेने याप्रकरणी रविवारी (दि. 2) काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी वृद्धेच्या रहाटणी येथील सनशाईन नगर येथे राहणाऱ्या मुलगी (वय 50) व जावई (वय 55) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे आई-वडील दिल्लीत राहात होते.
advertisement
मुलीकडून आईला मारहाण
view commentsवडिलांचे पासबुक, चेकबुक, पॅनकार्ड, अन्य कागदपत्रे मागितली असता, डॉक्टर मुलीने आईला मारहाण केली. तसेच बनावट स्वाक्षरी करून आई-वडिलांच्या संपत्तीची बेकायदेशीररीत्या विक्री करत आईची फसवणूक केली. त्यानंतर आईने मुलगी आणि जावयाविरोधात न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
March 04, 2025 10:37 AM IST


