शिर्डीत साईभक्ताला साडे नऊ लाखाला लुटलं अन् नाशिक गाठलं, पोलिसांना खबऱ्याने दिली टीप आणि...
- Published by:Prachi Amale
Last Updated:
लोखंडी कत्ती, गावठी कट्टा, एअर गन, धातूच्या अंगठ्या, चेन असा 9 लाख 64 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय.
हरीष दिमटे, प्रतिनिधी
शिर्डी : साईभक्तांची गाडी अडवून बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत लूटमार केल्याची धक्कादायक घटना 16 फेब्रुवारी रोजी कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात घडली होती. स्थानिक गुन्हे शाखेने श्रीरामपूर येथील आरोपींना ताब्यात घेत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून यापूर्वी देखील या टोळीने लूटमार केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत..
advertisement
गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवाशी मोहित पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसोबत इर्टिगा गाडीतून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी निघाले होते. त्यांची गाडी लासलगाव मार्गे कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात आली असता दुसऱ्या एका चार चाकी वाहनातून आलेल्या सात ते आठ जणांच्या टोळीने ओव्हरटेक करत पाटील यांची गाडी थांबवली. यावेळी आरोपींनी हातातील बंदूक आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवत लुटमार केली. मोहित पाटील यांच्याकडील सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा लाखो रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले होते.
advertisement
दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांचे पथक आणि कोपरगाव पोलिस यांनी समांतर तपास करत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा छडा लावलाय. गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून मिळालेल्या माहिती नुसार हा गुन्हा श्रीरामपूर येथील विजय गणपत जाधव याने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचत आरोपी विजय जाधव याच्यासह त्याच्या टोळीतील सिद्धार्थ भाऊसाहेब कदम, राहुल संजय शिंगाडे, सागर दिनकर भालेराव, समीर रामदास माळी आणि दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.. आरोपींकडून लोखंडी कत्ती, गावठी कट्टा, एअर गन, धातूच्या अंगठ्या, चैन असा 9 लाख 64 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय.
advertisement
जबरी चोरीचे चार गुन्हे केल्याचे समोर
या घटनेतील आरोपींनी या आगोदरही दरोडा आणि जबरी चोरीचे चार गुन्हे केल्याचे पोलिस तपासात समोर आलंय.. तर आरोपींनी रोख रक्कम आपापसात वाटून घेत सोन्या चांदीचे दागिने नाशिक येथील एका सोनाराला विकल्याची कबुली दिली आहे.. रस्तालूट आणि दरोड्यातील सराईत टोळी हाती लागल्याने पोलिस या प्रकरणी कसून तपास करत आहेत..
Location :
Shirdi,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
February 19, 2025 4:37 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
शिर्डीत साईभक्ताला साडे नऊ लाखाला लुटलं अन् नाशिक गाठलं, पोलिसांना खबऱ्याने दिली टीप आणि...