Satara Crime: बायको जास्त बोलते, नवऱ्याने रागात गळा दाबून केला खून; कराड हादरले

Last Updated:

पत्नीचा खून करणाऱ्या पतीस कराड तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.

News18
News18
सातारा :  पती-पत्नी म्हटलं की, तु तु मैं मैं आलीच. लग्न म्हणजे दोन मनं आणि दोन घरं जोडणारा एक संस्कार. लग्नाच्या गाठी या स्वर्गात जोडल्या जातात असंही म्हटलं जातं. अशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भांडणाशिवाय संसाराचा गाडा असाच त्यांचा पुढे जात असतो. परंतु किरकोळ कारणावरुन पत्नीचा खून करणारा पती असू शकतो का? पत्नी जास्त बोलते म्हणून त्याचा गळा दाबून खून केल्याची घटना सातारा जिल्ह्यात घडल्याची घटना घडली आहे.
कराड तालुक्यातील येथे बायको जास्त बोलत असल्याने नवऱ्याने गळा दाबून तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे. मयुरी कणसे असे 27 वर्षीय खून झालेल्या पत्नीचे नांव आहे. पत्नीचा खून करणाऱ्या पतीस कराड तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.

वाद विकोपाला गेला 

समोर आलेल्या माहितीनुसार, खून करणारा पती मयूर कणसे आणि मृत पत्नी मयुरी यांचे वारंवार खटके उडत होते. मयुरीचे सासरच्या लोकांशी पटत नसल्याने काही दिवस ती माहेरी देखील निघून गेली होती. परंतु अखेर नवऱ्याने तीची समजूत काढत काही महिन्यापूर्वीच तीला पुन्हा सासरी आणले. त्यानंतर दोघे घरच्यांपासून दूर भाड्याने घर घेऊन राहत होते. तिथे देखील त्या दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते.
advertisement

वर्षाच्या पहिल्याच दिवशी जोरदार भांडण

वर्षाच्या पहिल्याच दिवशी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. दोघांमधील वाद इतके विकोपाला गेली के रागात मयुरने मयुरीचा गळा आवळला, यामध्ये तीचा मृत्यू झाला. मयुरी जास्त बोलते म्हणून खून केल्याचे मयुरने सांगितले. पत्नीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कराड उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Satara Crime: बायको जास्त बोलते, नवऱ्याने रागात गळा दाबून केला खून; कराड हादरले
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement