advertisement

Jalgaon Crime: खून का बदला खून! रस्त्यात बुलेट लावून कार अडवली, कपाळाच्या मधोमध घातली गोळी

Last Updated:

Crime in Jalgaon: जळगाव जिल्ह्यातील धरणगावात एका तरुणाने आपल्या वडिलांच्या खूनाचा बदला खून करून घेतला आहे.

News18
News18
विजय वाघमारे, प्रतिनिधी जळगाव: जळगाव जिल्ह्यातील धरणगावात हत्येची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणाने आपल्या वडिलांच्या खूनाचा बदला खून करून घेतला आहे. आरोपी मुलाने बापाच्या खूनात आरोपी असलेला आणि नंतर निर्दोष सुटलेल्या व्यक्तीची डोक्यात गोळी घालून हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळाला नाही. तर त्याने थेट धरणगाव पोलीस स्टेशन गाठत स्वत:ला पोलिसांकडे सरेंडर केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली.
ही घटना जळगावच्या धरणगाव तालुक्यातील सोनवद गावाजवळील विहीर फाटा परिसरात घडली. राहुल सावंत या 26 वर्षीय तरुणाने पंधरा वर्षांपूर्वी आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला म्हणून गोपाल मालचे नावाच्या व्यक्तीची गोळ्या घालून हत्या केली आहे. हत्येची ही घटना समोर येताच धरणगावसह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राहुलच्या वडिलांचा 2010 मध्ये गावातील वादातून खून झाला होता. या प्रकरणात गोपाल मालचे हा आरोपी होता. त्याने राहुलच्या वडिलांचा खून केल्याचा आरोप होता. मात्र या खटल्यातून गोपाल मालचे याची निर्दोष सुटका झाली होती. कोर्टानं निर्दोष सोडलं असलं तरी राहुलच्या मनात वडिलांच्या खूनाचा बदला घेण्याची आग धगधगत होती.
advertisement
मंगळवारी रात्री साधारण आठच्या सुमारास गोपाल मालचे हे खामखेडे येथून आपल्या परिवारासह वाकटूकी येथे आपल्या घरी परत येत होते. यावेळी राहुलने विहीर फाटा येथे गोपाल मालचे यांच्या कारसमोर आपली बुलेट लावली. रस्त्यावर बुलेट लावलेली पाहून गोपाल मालचे हे कारमधून खाली उतरले. यावेळी राहुलने गोपालच्या कपाळाच्या मधोमध नेम धरत गोळी झाडली. यात गोपाल मालचेचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
खून केल्यानंतर राहुल सावंतने घटनास्थळावरून पळ न काढता थेट धरणगाव पोलीस स्टेशन गाठले आणि स्वतःहून पोलिसांकडे सरेंडर केलं. यासंदर्भात धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गावात तणावाचे वातावरण असल्यामुळे पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Jalgaon Crime: खून का बदला खून! रस्त्यात बुलेट लावून कार अडवली, कपाळाच्या मधोमध घातली गोळी
Next Article
advertisement
Budget Stocks: बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; कोणाला फायदा होणार हे आधीच ठरले? 'सिक्रेट लिस्ट'ने वाढवलं टेन्शन
बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; कोणाला फायदा होणार हे आधीच ठरले
  • उद्या रविवार पण सुट्टी नाही

  • शेअर्सची सिक्रिट लिस्ट आली समोर

  • उद्यासाठी पैसे आजच तयार ठेवा!

View All
advertisement