सुहागरातला प्रेमाच्या बदल्यात मिळाला त्रास; रुग्णालयात पोहोचला नवरा, तर बायकोविरोधात गुन्हा दाखल, अजब-गजब प्रकरण समोर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
सुहागरातला बायकोनं असं काही केलं ज्यामुळे नवरा थेट रुग्णालयात पोहोचला. एवढच नाही तर बायकोविरोधात तक्रार दाखल केली गेली आणि तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबई : लग्नानंतर नवरा-बायकोचं नातं प्रेम, विश्वास आणि समजुतीवर उभं राहतं असं मानलं जातं. पण काही वेळा हे नातं अवघ्या काही महिन्यांतच तुटण्याच्या उंबरठ्यावर येतं. असंच एक प्रकरण सध्या सोशल मीडियावरुन समोर आलं आहे. ज्याबद्दल ऐकून सगळयांनाच धक्का बसला आहे. या प्रकरणामध्ये सुहागरातला बायकोनं असं काही केलं ज्यामुळे नवरा थेट रुग्णालयात पोहोचला. एवढच नाही तर बायकोविरोधात तक्रार दाखल केली गेली आणि तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की नक्की असं घडलं तरी काय?
नेमकं काय घडलं?
ही घटना बिजनौर जिल्ह्यातील मंडावर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. शिमला कला गावातील चांदवीर उर्फ चांद याचा विवाह 29 एप्रिल 2025 रोजी अलीपुरा जट (कोतवाली देहात क्षेत्र) येथील तनुशी झाला होता.
नवऱ्याचा आरोप आहे की, बायको नेहमी कुणाशीतरी फोनवर बोलत असे आणि तो आल्यावर लगेच कॉल कट करत असे. 20 ऑगस्टच्या संध्याकाळी त्याने बायकोशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असता बायकोनं अचानक ब्लेडने त्याच्या खासगी अवयवावर दोन ठिकाणी वार केले. घरच्यांनी त्याच्या किंकाळ्या ऐकून धाव घेतली आणि रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या अवस्थेत रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी सात टाके घालून त्याचा जीव वाचवला.
advertisement
बायको तनुनेही नवऱ्यावर गंभीर आरोप केले. तिचं म्हणणं आहे की लग्न नवीन होतं, पण पती सतत तिच्यावर संशय घेत असे आणि रोज जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असे. सुहागरात्रीपासूनच तिचा नवरा तिच्यावर जबरदस्ती करत असल्याचं तिने सांगितलं त्यामुळे तिला वेदना आणि त्रास होत होता. नवरा तिच्या त्रासाला जराही समजून घेत नव्हता, म्हणून रागाच्या भरात तिने त्याच्यावर हल्ला केला.
advertisement
मंडावर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजकुमार सरोज यांनी सांगितलं की, पीडित नवऱ्याच्या तक्रारीवरून बायको विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप तिची अटक झालेली नाही, पण चौकशी करण्यात येणार आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि सर्व बाजू तपासल्या जात आहेत. दरम्यान, गावभर या नववधूच्या धक्कादायक कृत्याची चर्चा सुरु आहे आणि लोक अवाक झाले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 22, 2025 4:06 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
सुहागरातला प्रेमाच्या बदल्यात मिळाला त्रास; रुग्णालयात पोहोचला नवरा, तर बायकोविरोधात गुन्हा दाखल, अजब-गजब प्रकरण समोर