ना रील ना अकॅडमी, राधिकाच्या हत्येचं खरं कारण वेगळंच, गावकऱ्याचा खळबळजनक दावा
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Tennis Player Radhika Yadav Case: मुलीची कमाई खातो म्हणून गावातील लोक मला टोमणे मारायचे, यातून मी राधिकाची हत्या केली, असं राधिकाच्या वडिलांनी सांगितलं, पण गावकऱ्यांनी केलेला दावा वेगळाच आहे.
राष्ट्रीय टेनिसपटू राधिका यादवची तिच्याच वडिलांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. राधिका सोशल मीडियावर रील बनवायची, हे वडिलांना पसंत नव्हतं. तसेच तिने स्वत:ची टेनिस अकॅडमी सुरू केली होती, यावरही वडिलांचा आक्षेप होता. मुलीच्या पैशांवर जगतो, म्हणून लोक गावात टोमणे मारायचे, याच कारणातून वडिलांनी राधिकाची गोळ्या घालून हत्या केली, असं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. वडिलांनी देखील असाच जबाब पोलिसांना दिल्याचं सांगितलं जातंय.
पण गावकऱ्यांनी मात्र वेगळाच दावा केला आहे. राधिकाचे वडील दीपक यादव यांना गावात कुणीही अशाप्रकारे टोमणे मारत नव्हतं. ते मुलीच्या पैशांवर जगतात, असं कुणी कधीही म्हटलेलं आम्हाला आठवत नाही, असा दावा गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे राधिकाच्या वडिलांनी पोलिसांत दिलेला जबाब देखील खोटा असू शकतो, असा संशय व्यक्त केला जातोय.
गुरुग्रामच्या वजिराबाद नगरपालिकेच्या नगरसेवकाने एका हिंदी वृत्तपत्राला सांगितलं की, 'दीपक भाईंना कोणीही सांगितले नाही की, ते त्यांच्या मुलीची कमाई खातात. आम्ही गावात असं कधीही ऐकले नाही. आमच्या गावातील लोक भाड्याच्या व्यवसायातून चांगले पैसे कमवतात. प्रत्येक घराला ४ ते ५ लाख रुपये मिळतात. दीपक आणि त्याच्या भावाची कमाई देखील अशीच होती. त्यामुळे मुलीची कमाई खाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.'
advertisement
वजिराबाद हे टेनिसपटू राधिकाचे वडील दीपक यादव यांचे मूळ गाव आहे. दीपकवर १० जुलै रोजी राधिकावर चार गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. राधिका टेनिस शिकवत असे. गावातील लोक मला टोमणे मारायचे की मी माझ्या मुलीची कमाई खातो. या रागाच्या भरात मी राधिकाची हत्या केली, असं राधिकाच्या वडिलांनी सांगितलं, पण गावकऱ्यांनी केलेला दावा वेगळाच आहे. गावकऱ्यांच्या मते, दीपक यांना महिन्याला भाड्याचे लाखो रुपये येत होता. दीपकला आपल्या मर्जीने राधिकाचं लग्न लावून द्यायचं पण राधिका यासाठी तयार नव्हती. याच गोष्टीवरून दीपक तिच्यावर नाराज होता. राधिकाच्या मोबाईलमधील चॅट्स डिलीट करण्यात आल्याचेही समोर आले आहे. कदाचित त्यातच तिच्या हत्येचं गूढ लपलं असावं, असंही गावकऱ्यांनी सांगितलं आहे.
Location :
Hisar,Haryana
First Published :
July 13, 2025 12:00 PM IST