पोटच्या पोरीनं केला कांड; आईचं चोरलं 'इतकं' तोळं सोनं अन् दिलं मित्राला, आता 'तो' म्हणतोय की...

Last Updated:

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने अल्लड मैत्रीच्या नात्यातून एक धक्कादायक कृत्य केले आहे. तिने तिच्या आईचे आयुष्यभर...

Chhatrapati Sambhajinagar Crime
Chhatrapati Sambhajinagar Crime
छत्रपती संभाजीनगर : एका 17 वर्षीय मुलीने अल्लड मैत्रीच्या नात्यातून एक धक्कादायक कृत्य केले आहे. आईने आयुष्यभर कष्ट करून जमवलेले तब्बल 14 तोळे सोन्याचे दागिने आणि दीड लाख रुपयांची रोकड तिने चोरून तिच्या मित्राला देऊन टाकली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आईला मोठा धक्का बसला आणि त्यांना पोटच्या मुलीसह त्या मित्रावर चोरीचा गुन्हा दाखल करण्याची वेळ आली. मंगेश विलास पंडित (वय-19, रा. बेगमपुरा) असे अटक केलेल्या मित्राचे नाव असून, अल्पवयीन मुलगी फरार आहे.
रक्षाबंधनाला लक्षात आली चोरी
आरोग्य विभागातून नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या 58 वर्षीय महिला आपला मुलगा आणि मुलीसह हडको परिसरात राहतात. 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण असल्याने त्यांच्या मुलाने सोन्याची अंगठी मागितली. जेव्हा त्यांनी कपाट उघडले, तेव्हा त्यांना डब्यात एकही दागिना दिसला नाही. सोबतच 1 लाख 55 हजार रुपये रोख रक्कमही गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुमारे 14.1 तोळे दागिने आणि 1 लाख 55 हजार रुपये चोरीला गेल्याने त्यांना मोठा धक्का बसला.
advertisement
सोनं चोरल्याचे मुलीने केलं कबूल
त्यांनी याबद्दल मुलाला विचारले असता, त्याला काहीच माहिती नसल्याचे त्याने सांगितले. पण अकरावीत शिकणारी मुलगी मात्र उत्तर देताना गडबडली. आईने तिला विश्वासात घेऊन विचारल्यावर तिने आपला मित्र मंगेश याला हे सर्व दागिने आणि पैसे दिल्याची कबुली दिली. मंगेशने दागिने नसल्याचे सांगितल्याने हतबल झालेल्या आईने अखेर पोलिसांत तक्रार दाखल केली.
advertisement
मित्राने सांगितले, 'पैसे खाण्यापिण्यावर उडवले'
तक्रार मिळताच पोलीस निरीक्षक मंगेश जगताप आणि उपनिरीक्षक सचिन देशमुख यांनी तात्काळ कारवाई करत मंगेशला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत मंगेशने गुन्हा कबूल केला. त्याने मैत्रिणीला भावनिक करून तिच्याकडून दागिने आणि पैसे घेतल्याचे सांगितले. पण हे सर्व दागिने विकून आलेले पैसे खाण्यापिण्यावर उडवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, मंगेशला अटक केली आहे. त्याने दागिने कुठे विकले आणि पैशांचे काय केले, याचा पुढील तपास सुरू असल्याचे निरीक्षक जगताप यांनी सांगितले.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
पोटच्या पोरीनं केला कांड; आईचं चोरलं 'इतकं' तोळं सोनं अन् दिलं मित्राला, आता 'तो' म्हणतोय की...
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement