VIDEO : नाशिकमध्ये गोळीबाराचा थरार, टार्गेटवर बिल्डरचं घर, दोघांनी बंदूक काढली अन्...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Gun Firing in Nashik: नाशिकच्या म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक: नाशिकच्या म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास आलेल्या दोन हल्लेखोरांनी एका बिल्डरच्या घरावर गोळीबार केला आहे. या गोळीबाराच्या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या दिंडोरी रस्त्यावर एका नामवंत बिल्डरचं घर आहे. शुक्रवारी पहाटे ४ वाजून ३७ मिनिटांनी त्यांच्या घरावर अज्ञातांनी गोळीबार आणि दगडफेक केली आहे. गोळीबारानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. मात्र भल्या पहाटे अशाप्रकारे गोळीबार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या गोळीबाराचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
advertisement
व्हायरल व्हिडीओत दोन तरुण शुक्रवारी पहाटे ४ वाजून ३७ मिनिटांनी बिल्डर राहत असलेल्या परिसरात आले. दोघांनी आपली ओळख लपवण्यासाठी तोंडाला कपडा बांधला होता. दरम्यान, एकाने बंदूक काढून बिल्डरच्या घराच्या दिशेनं गोळीबार केला. तर दुसऱ्या हल्लेखोराने दगडफेक केली. गोळीबार गेल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.
नाशिकमध्ये दोन अज्ञातांनी पहाटे बिल्डरच्या घरावर गोळीबार केला आहे. pic.twitter.com/62dsuiYSuB
— News18Lokmat (@News18lokmat) February 7, 2025
advertisement
धक्कादायक बाब म्हणजे गोळीबाराच्या दोन दिवस आधी संबंधित बिल्डरच्या घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. तोडफोड केल्याची घटना ताजी असताना आता बिल्डरच्या घरावर गोळीबार केला आहे. आता हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, याची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र खंडणी किंवा धमकावण्याच्या हेतूने हा गोळीबार केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा तपास करत आहेत.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
February 07, 2025 1:15 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
VIDEO : नाशिकमध्ये गोळीबाराचा थरार, टार्गेटवर बिल्डरचं घर, दोघांनी बंदूक काढली अन्...