एक चूक अन् मामाने केला खेळ खल्लास, भाच्याला लोखंडी रॉडसह दगडाने ठेचलं, सांगलीतील भयंकर घटना

Last Updated:

Crime in Sangli: सांगलीच्या कुपवाड शहरात एक अमानुष घटना उघडकीस आली आहे. येथील एका व्यक्तीने आपल्या सख्ख्या भाच्याचा निर्घृण खून केला आहे.

Ai Generated Photo
Ai Generated Photo
सांगली: सांगलीच्या कुपवाड शहरात एक अमानुष घटना उघडकीस आली आहे. येथील एका व्यक्तीने आपल्या सख्ख्या भाच्याचा निर्घृण खून केला आहे. आरोपीनं आपल्या मुलाला हाताशी धरून भाच्याला भयंकर मृत्यू दिला आहे. दोघांनी लोखंडी रॉड आणि दगडाने भाच्याला ठेचलं आहे. मामानेच अशाप्रकारे भाच्याची हत्या केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
संदीप रावसाहेब सावंत आणि सौरभ संदीप सावंत असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. तर राहुल अप्पासाहेब सूर्यवंशी असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. आरोपी संदीप सावंत आणि मयत राहुल सूर्यवंशी हे दोघंही नात्याने मामा-भाचे लागतात. दोघांचं घरही एकमेकांच्या घराशेजारी आहे. पण त्यांच्यात मागील काही काळापासून जमीनीचा वाद आहे. दोन्ही कुटुंबात वैर आहे.
advertisement
असं असताना घटनेच्या दिवशी मयत राहुल याने मामा संदीप सावंत यांच्या मुलीची छेड काढली होती. ही बाब मामाला कळाल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यानंतर मामाने आपला मुलगा सौरभ याच्या मदतीने राहुलला गाठलं. दोघांनी लोखडी पाईप आणि दगडाने राहुलला बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी बेदम होती की घटनास्थळीच भाच्याचा रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला. भरदुपारी हा धक्कादायक प्रकार घडला.
advertisement
या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. मामाने असं निर्घृणपणे भाच्याची हत्या केल्यानं परिसरात दहशत निर्माण झाली. या प्रकरणाची माहिती मिळताच कुपवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर त्यांनी मयत राहुलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करत आरोपी मामा संदीप सावंत आणि मामेभाऊ सौरभ सावंत यांना अटक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
एक चूक अन् मामाने केला खेळ खल्लास, भाच्याला लोखंडी रॉडसह दगडाने ठेचलं, सांगलीतील भयंकर घटना
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement