Rama Duwaji : प्रसिद्ध डायरेक्टरची सून, न्यूयॉर्कची 'फर्स्ट लेडी', कोण आहे रमा दुवाजी?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Who is Rama Duwaji: बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शिका जिच्या नावावर अनेक दर्जेदार सिनेमे आहेत. तिने अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. तिने ऑस्करपर्यंतही मजल मारली आहे. अशा या बॉलिवूड दिग्दर्शिकेची सून ही अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये असते. न्यूयॉर्कमध्ये तिला ब्युटी क्वीन म्हणून ओळखलं जातंय. तिचा नवरा न्यूयॉर्कचा महापौर आहे. रमा दुवाजी असं तिचं नाव आहे. कोण आहे ही रमा दुवाजी पाहूयात.
न्यूयॉर्कच्या महापौरपदी जोहरान ममदानी हा सर्वात तरुण आणि पहिला भारतीय-अमेरिकन मुस्लिम महापौर म्हणून निवडून आला आहे. रमा दुवाजी ही जोहरान ममदानी यांची पत्नी आहे. रमा दुवाजी ही या प्रवासात जोहरान ममदानी यांची सायलेंट स्ट्रेंथ बनली आहे. सीरियन-अमेरिकन कलाकार असलेली रमा प्रवास आणि समाजातील स्टोरी लोकांसमोर आणत असते. जोहरान यांच्या प्रवासत ती पडद्यामागून काम करत होती.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
रमा एका कलात्मक वातावरणात वाढली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिचे पालक सीरियन-अमेरिकन आहेत आणि वेगवेगळ्या देशांमध्ये राहून तिने संस्कृती, ओळख आणि स्थलांतराच्या स्टोरीज जवळून अनुभवल्या. आहेत. या अनुभवांनी तिची कला अधिकच गहिरी झाली. एक चित्रकार आणि सिरेमिक कलाकार म्हणून तिने तिच्या कामांमध्ये मानवी कथा आणि भावनांचा समावेश केला.
advertisement
जोहरान आणि रमाची लव्हस्टोरी सिनेमाच्या सेटवर किंवा राजकीय मंचावर झाली नाही तर डेटिंग अॅपवर सुरू झाली होती. म्युझिक आणि स्थलांतरच्या स्टोरींच्या माध्यमातून ते एकमेकांना भेटले. रमाची फॅमिली सीरियाहून अमेरिकेत आली होती तेव्हा जोहरानचे कुटुंब युगांडाहून भारतात आणि नंतर क्वीन्स, न्यू यॉर्क येथे गेले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
जर जोहरान ममदानी न्यूयॉर्कचे पुढचे महापौर झालेत. तर रमा दुवाजी या शहराच्या सर्वात तरुण फर्स्ट लेडी ठरली आहे आणि कदाचित एलूसिवही. तिला जे लोक ओळखतात ते सांगतात की, ती अत्यंत शांत स्वभावाची आहे. म्हणजे तो गूढ आहे असं नाही. ती एक विचारसरणी आहे. माणूस शब्दांमधून नाही तर कामातून बोलतो असा तिचा विश्वास आहे.


