पतीनं मारलेली चापट लागली जिव्हारी, महिलेनं चिमुकलीसह आयुष्याचा केला भयंकर शेवट

Last Updated:

Crime in Wardha : वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका महिलेनं दीड वर्षांच्या चिमुकलीसह आयुष्याचा भयावह शेवट केला आहे.

AI Generated Photo
AI Generated Photo
नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा: वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील फुकटा गावात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका महिलेनं दीड वर्षांच्या चिमुकलीसह आयुष्याचा भयावह शेवट केला आहे. पतीने चापट मारल्याच्या रागातून महिलेनं हे टोकाचं पाऊल उचललं आहे. याप्रकरणी वडनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
शशिकला पिंटू घुले असं आत्महत्या करणाऱ्या विवाहित महिलेचं नाव आहे. त्यांनी दीड वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. घटनेच्या दिवशी पतीने शशिकला यांना शेतात चरत असलेल्या मेंढ्यांना परत आणण्यास सांगितलं होतं. पण त्यांनी यास नकार दिला. यानंतर संतापलेल्या पतीने शशिकला यांना मारहाण केली. याच रागातून संतप्त विवाहितेने पोटच्या दीड वर्षाच्या चिमुकलीला सोबत घेत लगतच्या शेतातीलच विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असलेलं घुले कुटुंब फुकटा गावात मेंढ्या चरण्यासाठी घेऊन आले होते. त्यांचा मेंढ्या सांभाळण्याचा व्यवसाय आहे. मेंढ्या चारुन आणल्यानंतर त्यांना जाळीत कोंडायचं होतं. मात्र, मेंढ्या शेजारच्या शेतातील पिकाकडे गेल्याने पिंटूने पत्नी शशिकलाला मेंढ्यांना आणण्यास सांगितले. मात्र, शशिकलाने मेंढ्या आणायला नकार दिला. यामुळे संतापलेल्या पिंटूने पत्नीच्या कानशिलात लगावत मेंढ्या आणण्यास सांगितले. शशिकला रागाच्या भरात तिच्या मुलीसह मेंढ्या आणायला गेली. मात्र, तिने पतीच्या रागावर वरघणे यांच्या शेतातील विहिरीत मुलीसह उडी मारुन आत्महत्या केली.
advertisement
विहिरीत उडी मारताना तेथील काही नागरिकांना तिला बघितला. त्यांनी तत्काळ इतरांना गोळा करत माय लेकीचा मृतदेह विहिरीबाहेर काढला. मृत विवाहितेच्या घरातील नातेवाईकही घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी कुठलीही तक्रार नसल्याचे सांगितले. दोघांच्याही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. प्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपासाला सुरुवात केली आहे. वडनेर पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या/क्राइम/
पतीनं मारलेली चापट लागली जिव्हारी, महिलेनं चिमुकलीसह आयुष्याचा केला भयंकर शेवट
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement