ज्याच्यासाठी पतीला सोडलं, त्याच BF ने दिला दगा, लव्ह स्टोरीचा थरकाप उडवणारा शेवट

Last Updated:

Crime News: प्रियकरासाठी पहिल्या पतीला सोडणाऱ्या एका महिलेचा भयंकर अंत झाला आहे. महिलेची राहत्या घरात निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

News18
News18
प्रियकरासाठी पहिल्या पतीला सोडणाऱ्या एका महिलेचा भयंकर अंत झाला आहे. महिलेची राहत्या घरात निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही हत्या दुसरी तिसरी कुणी नव्हे तर तिच्याच प्रियकराने केल्याची माहिती समोर आली आहे. ज्याच्यासाठी महिलेनं आपला पती आणि घर सोडलं, त्याच प्रियकराने महिलेचा गळा घोटला आहे. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
मिळेल्या माहितीनुसार, ही घटना बरेलीच्या रामगंगा नगर भागात घडली. येथील एका घरात संबंधित महिला मृतावस्थेत आढळली. ही महिला या घरात तिच्या प्रियकरासोबत राहत होती. शुक्रवारी, घरात महिलेचा मृतदेह आढळला. शवविच्छेदन अहवालात महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी महिलेचा दुसरा पती आसिफ उर्फ ​​गुड्डू याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. आरोपी गुड्डू फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
advertisement

पहिल्या पतीला सोडून प्रियकराशी लग्न

मूळची भुता पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मल्हापूर गावातील रहिवासी असलेली ३० वर्षीय मीरा शर्मा हिचे पूर्वी पवन शर्माशी लग्न झाले होते. दोघांनाही पहिल्या लग्नातून दोन मुलं आहेत. पण परस्परातील वादामुळे मीरा तिच्या पतीला सोडून शाहजहांपूर येथील रहिवासी असलेल्या तिच्या प्रियकर आसिफ उर्फ ​​गुड्डूसोबत राहू लागली. दोघांनीही लग्न केले आणि रामगंगा नगरच्या ईडब्ल्यूएस कॉलनी, सेक्टर-७ येथे राहायला गेली. मीराचा धाकटा मुलगा गोविंद (४) देखील त्यांच्यासोबत राहत होता. गोविंदा गुड्डूला मामा म्हणून हाक मारायचा.
advertisement

शेजाऱ्यांनी मृत्यूची माहिती दिली, मुलानं गुपित फोडलं

शुक्रवारी दुपारी शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली की, मीरा तिच्या घरात मृतावस्थेत पडली आहे. घटनेची माहिती मिळताच सीओ हायवे नीलेश कुमार मिश्रा आणि बिठारी चैनपूर ठाणे प्रभारी चंद्र प्रकाश शुक्ला घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक टीमलाही बोलावण्यात आले. टीमने घराची तपासणी केली आणि पुरावे गोळा केले. यावेळी पोलिसांनी मीराचा चार वर्षांचा मुलगा गोविंदाशी संवाद साधला. त्याची विचारपूस केली असता "मामाने आईचा गळा दाबला" असं त्याने पोलिसांना सांगितलं.
advertisement

आरोपी फरार, पोलिसांच्या तीन पथकांचा शोध सुरू

पोलिसांच्या मते, आरोपी गुड्डू हत्येपासून फरार आहे. त्याच्या शोधासाठी तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. आजूबाजूच्या परिसरात सतत छापे टाकले जात आहेत आणि आरोपीचे मोबाईल लोकेशन देखील शोधले जात आहे. ही घटना उघडकीस आल्यापासून परिसरात दहशतीचे वातावरण आहे. मीराच्या कुटुंबाने आरोपीवर प्रथम तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचा आणि नंतर तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे.
मराठी बातम्या/क्राइम/
ज्याच्यासाठी पतीला सोडलं, त्याच BF ने दिला दगा, लव्ह स्टोरीचा थरकाप उडवणारा शेवट
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement