Aai Kuthe Kay Karte Fame Actor : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्याने गुपचूप उरकलं लग्न, डेस्टिनेशन वेडिंगचा VIDEO व्हायरल!

Last Updated:

Niranjan Kulkarni Wedding: 'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेमधून घराघरात पोहोचलेला "अभिषेक देशमुख" म्हणजेच निरंजन कुलकर्णीने चाहत्यांना सुखद धक्काच दिलाय.

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्याने गुपचूप उरकलं लग्न
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्याने गुपचूप उरकलं लग्न
मुंबई : 'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेमधून घराघरात पोहोचलेला "अभिषेक देशमुख" म्हणजेच निरंजन कुलकर्णीने चाहत्यांना सुखद धक्काच दिलाय. अभिनेता लग्नबंधनात अडकला असून त्याच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ, सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. निरंजनवर चाहत्यांच्या शुभेच्छा आणि आशिर्वादांचा वर्षाव होत आहे.
नुकताच त्याने इन्स्टाग्रामवर एक सुंदर व्हिडिओ शेअर करत आपल्या डेस्टिनेशन वेडिंगची झलक चाहत्यांना दिली. अथांग समुद्राच्या साक्षीने, स्वच्छ निळ्या आकाशाखाली निरंजन आणि मनीषा गुरम यांनी एकमेकांना वरमाला घालत लग्नगाठ बांधली.
निरंजनची नववधू मनीषा गुरम ही व्यावसायिक न्यूट्रिशनिस्ट आहे. फिटनेस आणि हेल्दी लाइफस्टाइल टिप्ससाठी ती ओळखली जाते. रिसेप्शनसाठी या नवविवाहित जोडप्याने खास इंडो-वेस्टर्न लूक केला. काळ्या रंगाच्या क्लासिक सूटमधील निरंजन आणि डिझायनर गाऊनमधील मनीषाचं सौंदर्य पाहून सर्वांचंच लक्ष वेधलं गेलं. त्यांच्या या खास क्षणाला अनेक मराठी कलाकारांनी शुभेच्छा दिल्या.
advertisement
advertisement
दरम्यान, निरंजन 'जावई विकत घेणे आहे', 'सोल-कढी', 'एक थ्रिलर नाईट' अशा वेगवेगळ्या मालिकांमध्ये आणि चित्रपटांत दिसला आहे. अभिनयासोबतच त्याने ठाण्यात एक हॉटेल सुरू करून व्यवसायिक क्षेत्रातही पाऊल ठेवलंय.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Aai Kuthe Kay Karte Fame Actor : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्याने गुपचूप उरकलं लग्न, डेस्टिनेशन वेडिंगचा VIDEO व्हायरल!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement