'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, मुंबईत घेतलं घर; पहिली झलकही केली शेअर!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
'आई कुठे काय करते' मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी प्रभूलकर. अभिनेत्री सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिच्या लाइफविषयी नवनवीन अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. मधुराणीने आता एक आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केलीय.
मुंबई : 'आई कुठे काय करते' मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी प्रभूलकर. अभिनेत्री सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिच्या लाइफविषयी नवनवीन अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. मधुराणीने आता एक आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केलीय. तिनं मुंबईत नवं घर खरेदी केलं आहे. याविषयी तिनं एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मधुराणी प्रभूलकरने मुंबईत नवं घर खरेदी केलं असून लेकीसोबत या नव्या घरात प्रवेश केला आहे. तिनं आपल्या मेहनतीनं ही स्वप्नपूर्ती केली आहे. घराची झलकही तिनं सोशल मीडियावर शेअर केली आहे.
मधुराणीने इन्स्टाग्रामवर या नव्या घराचा व्हिडिओ शेअर करत ही गुडन्यूज दिली. व्हिडिओ शेअर करत तिनं खास कॅप्शनही लिहिलंय. यामध्ये तिनं लिहिलं, "मुंबईत आपलं स्वतः चं घर असावं, आणि तेही विलेपार्ले पूर्व इथेच. हे अनेक वर्षं हृदयाशी जपून ठेवलेलं स्वप्न... ते स्वप्न पूर्ण होणं आणि लेकीच्या साथीनं त्या स्वप्नपूर्तीचा आनंद द्विगुणित होणं हे सगळंच अनमोल आहे."
advertisement
मधुराणीने पुढे लिहिलं, "आज मन कृतज्ञतेने भरून आलंय. आई वडिलांचे आणि सर्व थोरा मोठ्यांचे कृपाशीर्वाद, गुरुकृपा, आणि असंख्य शुभचिंतकांच्या सदिच्छा निव्वळ ह्यामुळेच हे स्वप्न साकारलंय....!!!".
advertisement
दरम्यान, मधुराणीने नवं घर खरेदी केल्याचा व्हिडिओ शेअर करत सांगताच चाहते आणि अनेक कलाकारांचे व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंट पहायला मिळत आहे. अनेकांनी तिला तिच्या या स्वप्नपूर्तीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. तिचं लोक कौतुक करताना कमेंट करत दिसत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 15, 2024 4:39 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, मुंबईत घेतलं घर; पहिली झलकही केली शेअर!