Rupali Bhosle : हवाई सुंदरीलाही संजनाची भुरळ; रूपाली भोसले म्हणाली, आजपर्यंत फक्त बॉलिवूड सेलिब्रेटींना...
- Published by:Minal Gurav
Last Updated:
तरूण वर्गात संजनाचे म्हणजे रुपाली भोसले चाहते आहेतच पण आता हवाई सुंदरीला देखील संजनाची भुरळ पडली. थेट विमानतच तिनं रूपाली आणि तिनं साकारलेल्या संजनावरील प्रेम व्यक्त केलं आहे.
मुंबई, 24 ऑक्टोबर : टेलिव्हिजनवरील कलाकार दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. दररोज दिसणाऱ्या चेहऱ्यांचे प्रेक्षकही चाहते असतात. टेलिव्हिजनची लोकप्रिय मालिका म्हणजेच 'आई कुठे काय करते'. मालिकेतील सगळ्याच कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. मालिकेत अरुंधती या पात्राला प्रेक्षकांचं जितकं प्रेम मिळालं तितकेच प्रेम संजना या पात्राला देखील मिळालं. अभिनेत्री रूपाली भोसले हिनं साकारलेली संजना प्रेक्षकांना चांगलीच भावली. तरूण वर्गात संजनाचे म्हणजे रुपाली भोसले चाहते आहेतच पण आता हवाई सुंदरीला देखील संजनाची भुरळ पडली. थेट विमानतच तिनं रूपाली आणि तिनं साकारलेल्या संजनावरील प्रेम व्यक्त केलं आहे.
आजवर आपण पाहिलं असेल की अनेक बॉलिवूड आणि साऊथच्या कलाकारांची फॅन फॉलोविंग पाहिली असेल. जिथे जाऊ तिथे त्यांचे फॅन्स त्यांना भेटत असतात. अनेकदा फ्लाइट्समध्ये हवाई सुंदरी त्यांच्याशी बोलतात. मध्यंतरी क्रिकेटर धोनी झोपलेला असताना त्याच्या हवाई सुंदरी फॅननं त्याच्याबरोबर गुपचूप फोटो काढत फॅन मुमेंट शेअर केली होती. त्याचप्रमाणे आता मराठी कलाकारांनाही सगळे ओळखू लागले आहेत. अभिनेत्री रूपाली भोसले ही त्यांच्यापैकीच एक अभिनेत्री ठरली आहे.
advertisement
अभिनेत्री रूपाली भोसले काही कामानिमित्त विमान प्रवास करताना तिथली हवाई सुंदरी तिची खूप मोठी फॅन असल्याचं तिला कळलं. हवाई सुंदरीनं रुपालीचं खूप कौतुक केलं. तिच्याबरोबर फोटो काढले आणि तिच्यासाठी एक प्रेमाचं लेटर देखील लिहिलं. हे सगळं पाहून रूपाली फार भारावून गेली. तिनं त्या हवाई सुंदरीबरोबरचे फोटो आणि तिनं लिहिलेलं लेटर शेअर करत भावना व्यक्त केल्यात.
advertisement
रुपाली भोसलेनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "आजपर्यंत बॉलिवूड सेलिब्रेटींचे असे फोटो किंवा केबिन क्रू त्यांच्याबरोबर फोटो काढतात, त्यांना गिफ्ट्स देतात आणि असे फोटो काढतात. पण आज जेव्हा माझ्याबरोबर हे सगळं घडलं तेव्हा खरंच खूप छान वाटलं. का माहिती नाही पण डोळे पाणावले, थोडी भावूक झाले पण चेहऱ्यावर एक हसू देखील होतं".
advertisement
advertisement
"मला आशा आहे की तुला आमच्याबरोबर प्रवास करून छान वाटलं असेल. आई कुठे काय करते मधील संजनाची मी खूप खूप खूप मोठी फॅन आहे. तू स्वत:ला ज्या पद्धतीनं प्रेझेंट करतेस ते मला खूप आवडतं. तुझी स्टाइल देखील मला खूप आवडते. आशा आहे की आपण पुन्हा लवकरच भेटू", असं प्रेमाचं लेटर हवाई सुंदरीनं रुपाली भोसलेसाठी लिहिलं आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 24, 2023 12:17 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Rupali Bhosle : हवाई सुंदरीलाही संजनाची भुरळ; रूपाली भोसले म्हणाली, आजपर्यंत फक्त बॉलिवूड सेलिब्रेटींना...







