Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीची नवी इनिंग! दुसऱ्या नवऱ्याचं निधन, पुन्हा मिळणार पहिल्या नवऱ्याची साथ

Last Updated:

अरुंधतीच्या दुसऱ्या नवऱ्याचं म्हणजेच आशुतोषचं निधन होतं. इथेच मालिकेची संपूर्ण कथा बदलली आहे. मालिकेच्या येणाऱ्या भागात नेमकं काय घडणार? पाहूयात.

अरुंधतीची नवी इनिंग!
अरुंधतीची नवी इनिंग!
मुंबई : आई कुठे काय करते या मालिकेनं नवीन वळण घेतलं आहे. मालिकेतील नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की, संपूर्ण घराला सांभाळणाऱ्या आईची म्हणजेच अरुंधतीची गोष्ट. अरुंधती दुसरं लग्न करते मात्र आपल्या मुलांप्रती आई म्हणून असलेली तिची सगळी कर्तव्य ती पार पाडत असते. अशातच अरुंधतीचं आयुष्य पुन्हा एकदा 360 ड्रिगीमध्ये फिरलं आहे. अरुंधतीच्या दुसऱ्या नवऱ्याचं म्हणजेच आशुतोषचं निधन होतं. इथेच मालिकेची संपूर्ण कथा बदलली आहे. अरुंधतीच्या आयुष्यातील नवी इनिंग सुरू झाली आहे. याच टप्प्यावर तिचा पहिला नवरा साथ देताना दिसणार आहे.
अरुंधती आणि आशुतोष यांच्या सुखी संसारात मनूची एंट्री होते आणि सगळं होत्याचं नव्हतं होतं. मनूची खरी आई माया तिला आशुतोषपासून दूर करते. मनूला परत आणण्यासाठी निघालेल्या अरुंधती आणि आशुतोष यांचा रस्त्यात अपघात होतो आणि या अपघातात आशुतोषचा जागीच मृत्यू होतो. आशुतोषच्या जाण्यानं अरुंधतीला मोठा धक्का बसतो.
advertisement
मालिकेच्या येणाऱ्या भागाचा नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यात आशुतोषच्या निधनानं सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. अरुंधतीची अवस्था अत्यंत कठीण झालेली असताना आशुतोषची आई म्हणजेच सुलेखा ताई आशुतोषच्या मृत्यूला अरुंधतीला जबाबदार धरतात. अरुंधतीशी असलेले सगळे संबंध तोडतात. अशावेळी अरुंधतीची पहिली सासू म्हणजे कांचन आई तिची आई बनून तिच्या पाठिशी उभी राहते.
advertisement
प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की, कांचन अरुंधतीला तिच्या घरी घेऊन जायला तयार होते. तर दुसरीकडे दुसऱ्या नवऱ्याचं निधन झाल्यानंतर आता अरुंधतीचा पहिला नवरा म्हणजेच अनिरुद्ध देखील तिच्या मदतीला पुढे आला आहे. आशुतोषच्या निधनानं शॉकमध्ये गेलेल्या अरुंधतीला अनिरुद्ध म्हणतो, "तू आता एकटी नाहीस. मी कायम तुला साथ देईन". त्यावर कांचन म्हणते, "आपण तिला आपल्या घरी घेऊन जाऊया का?"
advertisement
कांचन आणि अनिरुद्धच्या अशा वागण्यानं तिकडे संजना देखील शॉक होते. अरुंधतीला पुन्हा एकदा समृद्धी बंगल्यात परत आणण्यासाठी संजनाचा पहिल्यापासून विरोध असतो. घर आणि अनिरुद्ध दोन्हीही माझे असल्याची भावना संजनाच्या मनात येते आणि सगळं आपल्याबाजूने करण्याचे प्रयत्न ती सुरू करते.
advertisement
समृद्धी बंगला हा आप्पांच्या नावावर आहे. आप्पांनी ते घर अरुंधतीच्या नावावर केलं आहे. ते तिनं अनिरुद्धच्या नावावर केलं तर ते त्यांना मिळेल अशी माहिती संजना वकिलांकडून मिळवते. "आता जे काही आहे ते माझं आहे. ते घर ही आणि अनिरुद्धसुद्धा", असं संजना म्हणते. आता अरुंधती पुन्हा एकदा देशमुखांकडे राहायला गेल्यानंतर देशमुखांच्या घरात नेमकं काय घडणार? आशुतोषच्या दु:खातून अरुंधती स्वत:ला कशी सावरणार? अरुंधतीच्या आयुष्याची ही नवी इनिंग तिला कोणत्या दिशेनं घेऊन जाणार? हे मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीची नवी इनिंग! दुसऱ्या नवऱ्याचं निधन, पुन्हा मिळणार पहिल्या नवऱ्याची साथ
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement