Madhurani Gokhale: ‘आई कुठे काय करते’ संपली, आता मधुराणी गोखले काय करतेय? VIDEO शेअर दिली अपडेट

Last Updated:

Madhurani Gokhale: ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून गेली 5 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी गोखले. या मालिकेतून आई साकारून अभिनेत्री घराघरांत पोहोचली.

आता मधुराणी गोखले काय करतेय?
आता मधुराणी गोखले काय करतेय?
मुंबई : ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून गेली 5 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी गोखले. या मालिकेतून आई साकारून अभिनेत्री घराघरांत पोहोचली. या लोकप्रिय मालिकेत अरुंधती पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मात्र काहीच दिवसांपूर्वी या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यामुळे आता अरुंधती काय करतेय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मधुराणीने एक व्हिडिओ शेअर करत ती सध्या काय करतेय सांगितलं.
‘आई कुठे काय करते’ मालिका संपली असली तरी मधुराणी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्कात असते. अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असून तिथे चाहत्यांसोबत लाईफ अपडेट शेअर करत असते. मधुराणीने नुकताच इंस्टावर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये ती सध्या काय करतेय सांगितलं.
advertisement
मधुराणी गोखले पोस्ट
मधुराणी गोखलेने इंस्टावर एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यामध्ये ती झोपाळ्यावर मस्त निवांत बसून चहा पिताना दिसत आहे. या व्हिडिओला तिने एक शायरीदेखील लावली आहे. "हम लोग सारी जिंदगी अच्छे वक्क के पिछे गुजार देते है. हालाकी ये कोई जानता नही है, हम ये जो गुजार रहे है यही अच्छा वक्त है."
advertisement
या व्हिडिओला मधुराणीने कॅप्शन देत म्हटलं, "मी सध्या काय करतेय...?!!!!!chill टाकतेय...!!!" मधुराणीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांच्या भरपूर कमेंट पोस्टवर पाहायला मिळत आहे.
advertisement
दरम्यान, 2019 मध्ये ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तब्बल 5 वर्ष या मालिकेनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मालिकेतील कलाकारांना प्रेक्षक अगदी रोजच पहायचे त्यामुळे त्यांच्याशी एक वेगळंच नातं जोडलं गेलं होतं. मालिका संपताच प्रेक्षकांना त्यांचे आवडते कलाकार सध्या काय करत आहेत? असा प्रश्न पडतोय.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Madhurani Gokhale: ‘आई कुठे काय करते’ संपली, आता मधुराणी गोखले काय करतेय? VIDEO शेअर दिली अपडेट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement