Nishanchi : हिंदी सिनेमा केला अन् फ्लॉप झाला.... ठाकरेंच्या नातवाला कुणी थिएटर देता का थिएटर?

Last Updated:

Nishanchi : दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे याने 'निशांची' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात मात्र हा चित्रपट कमी पडलाय.

News18
News18
Nishanchi : दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्या ठाकरेने 'निशांची' (Nishanchi) या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. ऐश्वर्य हा जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांचा मुलगा आहे. एकीकडे 'दशावतार'सारखा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पाडत असताना दुसरीकडे 'जॉली एलएलबी 3' (Jolly LLB 3) आणि 'निशानची' हे बॉलिवूडचे चित्रपट रिलीज झाले आहेत. पण थिएटरमध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटांमध्ये 'दशावतार' या मराठी चित्रपटाचीच हवा असलेली पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांचा या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता आता दिवसेंदिवस या चित्रपटाचे शो वाढविण्यात येत आहेत. मराठीसह अमराठी प्रेक्षकही या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात जात आहेत. तर दुसरीकडे बॉलिवूडच्या चित्रपटांना मात्र याचा मोठा फटका बसला आहे. या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या 'निशांची' या चित्रपटाला मुळातच कमी शो मिळाले आहेत. तर आता हे शोदेखील कमी करण्यात येत आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. त्यामुळे ठाकरेंच्या नातवाला कोणी थिएटर देतं का थिएटर असं वातावरण सध्या निर्माण झालंय. हिंदी चित्रपट केल्याने तो फ्लॉप झाल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
इंडियन एक्सप्रेसनुसार, "निशानची" ला देशभरात 807 शो मिळाले, ज्यात मुंबईत 158 आणि दिल्ली-एनसीआरमध्ये 192 शो मिळाले. आता मुंबईसह काही ठिकाणी रिलीजच्या तीन दिवसांतच या चित्रपटाचे शो कमी करण्यात येत आहेत. एकीकडे मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नाही अशी ओरड असताना दुसरीकडे मात्र एका हिंदी चित्रपटाचे शो कमी करण्यात येत आहेत.
advertisement
बॉक्स ऑफिसवर ठरला फ्लॉप!
ऐश्वर्य ठाकरे अभिनीत 'निशांची' या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त 25 लाख रुपयांची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 39 लाख रुपये आणि तिसऱ्या दिवशी 21 लाख रुपये कमावले. एकंदरीतच आतापर्यंत रिलीजच्या तीन दिवसांत या चित्रपटाने फक्त 85 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे.
'निशांची' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अनुराग कश्यपने सांभाळली आहे. ऐश्वर्य ठाकरे, वेदिका पिंटो, मोनिका पंवार, मोहम्मद जीशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. निशांची हा एक क्राईम, ड्रामा असणारा चित्रपट आहे. अजय राय, विपिन अग्निहोत्री आणि रंजन सिंह यांनी जार पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
advertisement
काय आहे 'निशांची'चं कथानक?
'निशांची' या चित्रपटात कानपूरसारख्या छोट्या शहरात घडणारी एक गोष्ट दाखवण्यात आली आहे. बबलू, डबलू आणि बबलूची खास मैत्रीण वेदिका पिंटो एकत्र चोरी करतात. चोरीच्या वेळी बबलूला पकडले जाते आणि तुरुंगात पाठवले जाते, ज्यामुळे त्याच्या आयुष्यात मोठ्या अडचणी येतात. पुढे कथानकात एक ट्विस्ट येतो डबलू आणि वेदिका प्रेमात पडतात. मग खऱ्या अर्थात प्रेमाचं त्रिकूट, प्रेम आणि सत्यासाठीचा संघर्ष सुरू होतो.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Nishanchi : हिंदी सिनेमा केला अन् फ्लॉप झाला.... ठाकरेंच्या नातवाला कुणी थिएटर देता का थिएटर?
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement