जयंतरावांसाठी बापू बिरू यांच्या मुलाचं २ मिनिटांचं रांगडं भाषण, पडळकरांची अक्कल आणि लायकी काढली
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
सांगलीत गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात बापू बिरू वाटेगावकर यांचे पुत्र शिवाजीराव वाटेगावकर यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर शाब्दिक आसूड ओढले.
असिफ मुरसल, प्रतिनिधी, सांगली : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर अत्यंत अश्लाघ्य भाषेत टीका केल्याने राज्यभरातून त्यांच्याविरोधात रोष व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि धनगर समाज बांधवांकडून पडळकर यांच्याविरोधात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात बापू बिरू वाटेगावकर यांचे पुत्र शिवाजीराव वाटेगावकर यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर शाब्दिक आसूड ओढले.
महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाला राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री विश्वजित कदम, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार उत्तमराव जानकर, आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष मेहबूब शेख, महिला प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, बापू बिरू वाटेगावकर यांचे पुत्र शिवाजीराव वाटेगावकर यांच्यासह हजारो नागरिकांनी मोर्चाला उपस्थिती लावली होती.
advertisement
बापू बिरूच्या सुपुत्राने पडळकरांची लायकी काढली
जयंत पाटील यांच्या आई-वडिलांसंबंधी गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत चुकीचे वक्तव्य केले, जे करायला नको होते, असे स्पष्ट करीत शिवाजीराव वाटेगावकर यांनी पडळकरांच्या राजकीय कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नको त्या गोष्टी बोलून कॅमेरावर झळकण्याची त्याला सवय आहे. कशाला कुठेही तोंड खुपसतो, राजाराम बापूंवर बोलण्याची आपली लायकी आहे, अशा शब्दात पडखळकरांना झोडून काढले.
advertisement
सेवा करण्यासाठी जनतेने निवडून दिलं, मापं कशाला काढतो, कुठेही तोंड खुपसतो
पडळकर यांच्या टीकेने धनगर समाजात प्रचंड आक्रोश आहे. जयंत पाटील आणि त्यांच्या कटुंबाविरोधात ज्यांनी कारस्थान केले, त्यांना न शोभणारे आहे. जातीजातीत मतभेद घडविणाऱ्या अशा लोकांना जनतेने धडा शिकवणे गरजेचे आहे. जनतेने चांगले काम करण्यासाठी, सेवा करण्यासाठी निवडून दिले आहे. जनतेचे प्रश्न सोडविणे हे काम असताना पडळकरांना नको तिथे नाक खुपसायची सवय लागली आहे, अशा शब्दात वाटेगावकर यांनी सुनावले.
advertisement
राजाराम बापू यांच्या कार्यकर्तृत्वाचे महत्त्व सांगून त्यांच्यावर बोलायची तुझी लायकी आहे का? असा आक्रमक सवालही त्यांनी विचारला. त्याचवेळी शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाईवर बोलावं, जनतेच्या प्रश्नांवर बोलावे. ही तुला अक्कल कशी नाही? अशा रांगड्या भाषेत पडळकरांना झोडपून काढले.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
September 22, 2025 4:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जयंतरावांसाठी बापू बिरू यांच्या मुलाचं २ मिनिटांचं रांगडं भाषण, पडळकरांची अक्कल आणि लायकी काढली