BMC Election Ink-Controversy : मतदान करायला गेलेला मनसे अभिनेता भडकला, बायकोचा हात पुढे करत थेट पुरावाच दाखवला
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिजित पानसे यांनाही या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. अभिजीत पानसे त्यांच्या पत्नी आणि मुलीसह मतदान करायला गेली असता त्यांच्याबरोबरही शाईचा असात प्रकार घडला. त्यांनी थेट व्हिडीओ शेअर करत पुरावा दाखवला.
महापालिका निवडणुकीत मतदान केल्यानंतर मतदारांच्या बोटाला शाईऐवजी मार्कर लावण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला असून यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. काही वेळातच हा मार्कर पुसून जात असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकारावर मनसे नेते, अभिनेते आणि दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
अभिजित पानसे यांनाही या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. अभिजीत पानसे त्यांच्या पत्नी आणि मुलीसह मतदान करायला गेली असता त्यांच्याबरोबरही शाईचा असात प्रकार घडला. त्यांनी थेट व्हिडीओ शेअर करत पुरावा दाखवला.
अभिजीत पानसे म्हणाले, "आज मतदानाचा महत्त्वाचा दिवस. आपण सगळ्यांनी मतदान हे केलंच पाहिजे. गेल्या अनेक निवडणूका आपण पाहतोय, दुबार मतदान झालं. बोगस मतदान झालं. आता आज एक नवीन घोटाळा समोर आला आहे. आजपर्यंत मतदान झाल्यावर बोटावर शाई लावायचे. मी आणि माझ्या पत्नीने देखील लावली आहे. पण ही शाई नसून सरळ साधा, छोटा मार्कर ठेवण्यात आलाय."
advertisement
ही शाई नसून मार्कर असल्याचा पुरावा देखील अभिजीत पानसे यांनी दाखवला. नेलपॉलिश रिमुव्हरने त्यांनी बोटावरची शाई पुसण्याचा प्रयत्न केला आणि काही सेकंदात ती शाई पुसली गेली.
advertisement
अभिजीत पानसे पुढे म्हणाले, "मला बऱ्याच ठिकाणांवरून तक्रारी आल्या. नेलपॉलिश रिमुव्हर सोडा साध्या पाण्यानेही हा मार्कर जातो. आता याला नेमकं काय म्हणायचं?"
"मतदान करताना पूर्वी शाई लावायचे तिथे आता मार्कर आणून सत्ताधाऱ्यांना नेमकं काय करायचं आहे किंवा मतदानात काय फेरफार करायचा आहे, मला माहिती नाही. पण ही मतदानाची खोटी शाई ही लोकशाही नाही ही लोक शाई आपल्या संविधानाच्या विरोधात आहे."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 15, 2026 3:57 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
BMC Election Ink-Controversy : मतदान करायला गेलेला मनसे अभिनेता भडकला, बायकोचा हात पुढे करत थेट पुरावाच दाखवला