मनोज वाजपेयीच्या फ्लॉप सिनेमातील गाणे, आज ऐकलं तरी धाय मोकलून रडाल; मुलींनी ऐकलं तर हुंदका थांबणार नाही

Last Updated:

Bollywood Song : मनोज वाजपेयी यांच्या त्या सिनेमातील हे गाणे अजूनही लेकांना भावनिक करते. बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झालेल्या त्या सिनेमाने नॅशनल अवॉर्ड मिळवला होता.

News18
News18
बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे येतात आणि ते कधी जातात समजतही नाही, अगदी ते सिनेमे प्रेक्षकांच्या लक्षातही राहत नाहीत. तसेच बॉलिवूडचे असे काही सिनेमे आहेत जे फ्लॉप झाले. पण त्या सिनेमातील गाण्यांमुळे ते अजूनही लोकांच्या आठवणीत राहतात. बॉलिवूडचा एक असा सिनेमा होता जो बॉक्स ऑफिसवरती आपटला. पण त्या सिनेमातील एक गाणं होतं त्या गाण्याचा चाहतावर्ग अजूनही आहे. ते गाणं ऐकले की आपल्या डोळ्यातून आपोआप अश्रू येतात. अभिनेते मनोज वाजपेयी आणि उर्मिला मातोंडकर हे दोघं या सिनेमात दिसले होते.
ते गाणं कोणतं ? 
हा सिनेमा म्हणजे 'पिंजर'. ज्या सिनेमाला नॅशनल अवॉर्ड प्राप्त झाला होता. हा सिनेमा 2003 मध्ये रिलीज झाला होता. उर्मिला आणि मनोज वाजपेयी सारखे अभिनयाने कसलेले कलाकार असूनही हा सिनेमा फ्लॉप झाला होता. पण या सिनेमातील एक गाणं ते म्हणजे 'चरखा चलाती मा' हे खूपच हिट झाले होते. हे गाणं ऐकले की अजूनही ऐकणाऱ्यांचे डोळे ओले होतात.
advertisement
गाण्याचा सार नेमका काय ?
या गाण्यामध्ये सामाजातील कडू विषयांना समोर आणले होते. गायकाने इतके सुंदर गायले की त्यातील गाण्याचे सुमधूर स्वर आणि संगीत प्रेक्षकांच्या हृदयाला भिडते. हे गाणं इतके भावनिक होते की लोकांचा कंठ दाटून यायचा. या गाण्याला असे शूट केले गेले की, त्या गाण्यातील सार म्हणजे घरातील लहान मुलं आपल्याला सोडून गेले की त्याची आईचे काय हाल होतात, ती काय भावनेने जीवन जगत असेल, तिची किती तडफड होत असेल, हे सगळे त्या सीनमध्ये उभे केले होते.
advertisement
'चरखा चरखा मा' हे गाणे तेव्हा मुलीच्या लग्नात ती घर सोडून जाताना लावायचे. त्यामुळे लोकं खूपच भावूक व्हायची आणि तो माहोलही तसाच भावनिक बनायचा.या सिनेमाला हल्लीच 22 वर्षे पूर्ण झाली आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
मनोज वाजपेयीच्या फ्लॉप सिनेमातील गाणे, आज ऐकलं तरी धाय मोकलून रडाल; मुलींनी ऐकलं तर हुंदका थांबणार नाही
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement