Madhurani Gokhale: '87 वेळा रिजेक्ट झाले आणि...' मधुराणी गोखलेने शेअर केला Untold अनुभव
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Madhurani Gokhale: ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी गोखले घराघरांत पोहोचली. या मालिकेतील तिची भूमिका अनेक महिलांना कनेक्ट होणारी होती. त्यामुळे ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली होती आणि मधुराणी गोखलेही.
मुंबई : ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी गोखले घराघरांत पोहोचली. या मालिकेतील तिची भूमिका अनेक महिलांना कनेक्ट होणारी होती. त्यामुळे ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली होती आणि मधुराणी गोखलेही. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या कनेक्ट असते. तिच्या लाईफ रिलेटेड अपडेट चाहत्यांशी शेअर करत असते. नुकताच एक मधुराणीचा व्हिडिओ इंटरनेटवर लक्ष वेधून घेत आहे ज्यामध्ये ती अभिनेत्यांसाठी रियाज किती गरजेचा आहे हे सांगत आहे.
मधुराणी गोखलेने नुकतीच मिर्ची मराठी पॉडकास्टला एक मुलाखत दिली. यावेळी तिने कलाकारांचा रियाज करणं किती गरजेचं असतं यावर भाष्य केलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय म्हणाली मधुराणी गोखले?
मिर्ची मराठी पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये मधुराणी म्हणाली, “अभिनेत्यांना असं वाटतं की, आम्ही काय रियाज करायचा. मी खूप 70, 80 जाहिराती केल्या असतील. त्याच्या आधी मी 87 ऑडिशन दिली असतील ज्या फेल गेल्या होत्या. त्यानंतर मला पहिली जाहिरात मिळाली. पण त्या 87 ऑडिशन्स, ज्या फेल गेल्या होत्या तो माझा रियाज होता. ती एक जाहिरात क्रॅक करण्यासाठी. तो अभिनेत्याला करत राहणं गरजेचं आहे.”
advertisement
पुढे मधुराणी म्हणाली, “चांगली नाटकं जाऊन बघायला पाहिजे. मी करते अजूनही. मग एखादं कोणीतरी दिलेलं एक्सप्रेशन मला आवडलं तर मी आरशात करून बघते. तो डायलॉग बोलून बघते. हे मला क्रॅक करता येतंय का बघते. हे मला जमेल का? मग मी करून बघते ते. हा रियाज करत रहायला लागतो. आजकाल आपल्याकडे मोबाईलमध्ये कॅमेरा आहे. करा शूट तुमचा तुम्ही बघा. अशा कितीतरी पद्धतीने तुम्ही रियाज करू शकता.”
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 05, 2025 3:27 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Madhurani Gokhale: '87 वेळा रिजेक्ट झाले आणि...' मधुराणी गोखलेने शेअर केला Untold अनुभव