'अस्मिता'सोबत दुरावा आणि 'आदिती'सोबत बांधली लगीनगाठ, सुरुचीने शेअर केला नवऱ्याचा फोटो
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेता पियुश रानडेचं सुरूची अडारकबरोबर हे तिसरं लग्न आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मुंबई, 06 डिसेंबर : मराठी सिनेसृष्टीत लग्नाचा मौसम सुरू झालाय. नुकतंच अभिनेता प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांनी लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता प्रसिद्ध अभिनेत्री सुरूची अडारकर हिनं लग्न केलंय. प्रसिद्ध अभिनेता पियुष रानडेबरोबर अदितीनं लग्नगाठ बांधली आहे. दोघांच्या लग्नाची कुठेच चर्चा नव्हती. दोघे रिलेशनमध्ये असल्याची देखील कुणकुण नव्हती. दोघांनी गुपचूप लग्न करत सर्वांना आनंदाचा धक्का दिला आहे.
सुरूचीनं लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. घरचे नातेवाईक आणि मित्र मंडळींच्या उपस्थितीत दोघांनी लग्न केलं. अभिनेत्री सुरूची अडाकर हिनं 'ओळख' या मालिकेतून टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'का रे दुरावा' या मालिकेनं तिला ओळख मिळवून दिली. त्यानंतर मधली काही वर्ष ती मनोरंजन क्षेत्रात फारशी दिसली नाही. नुकत्याच येऊन गेलेल्या 'बाईपण भारी देवा' या सिनेमात सुरूचीनं काम केलं.
advertisement
advertisement
अभिनेता पियुश रानडेचं सुरूची अडारकबरोबर हे तिसरं लग्न आहे. पियुषचं पहिलं लग्न हे प्रसिद्ध अभिनेत्री शाल्मली तोळे हिच्याबरोबर झालं होतं. पण त्याचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. त्यानंतर पियुशनं अभिनेत्री मयुरी वाघ हिच्याबरोबर लग्नं केलं. 2017मध्ये दोघांनी लग्न केलं पण पियुशचं दुसरं लग्न देखील फार काळ टिकू शकलं नाही. दोघांच्या घटस्फोटानंतर काही वर्षांनी पियुषनं आता अभिनेत्री सुरूची अडारकर हिच्याबरोबर लग्न केलंय.
advertisement
अभिनेता पियुश रानडे सध्या कलर्स मराठीवरील काव्यांजली मालिकेत काम करतोय. पियुषनं त्याच्या अभिनयाची सुरूवात नाटकांपासून केली आहे. अनेक टेलिव्हिजन मालिका आणि सिनेमात त्यानं काम केलं आहे. 'लज्जा', 'एकाच ह्या जन्मी जणू', 'अस्मिता', 'शौर्य', 'साथ दे तू मला', 'पिंकिचा विजय' असो सारख्या अनेक प्रसिद्ध टेलिव्हिजन मालिकेत त्यानं काम केलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 06, 2023 1:14 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'अस्मिता'सोबत दुरावा आणि 'आदिती'सोबत बांधली लगीनगाठ, सुरुचीने शेअर केला नवऱ्याचा फोटो