सस्पेन्सचा डबल डोस, 'आम्ही दोघी' नंतर मुक्ता बर्वे आणि प्रिया बापटची जोडी पुन्हा पडद्यावर, 'असंभव'मध्ये रंगणार थरार
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Asambhav Marathi Movie : 'आम्ही दोघी' या गाजलेल्या चित्रपटानंतर आता मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट ही जोडी प्रेक्षकांना एका सस्पेन्स-थ्रिलर कथेत पाहायला मिळणार आहे.
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील दोन अत्यंत कसदार आणि प्रतिभावान अभिनेत्री, मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. 'आम्ही दोघी' या गाजलेल्या चित्रपटानंतर आता ही जोडी प्रेक्षकांना एका सस्पेन्स-थ्रिलर कथेत पाहायला मिळणार आहे. 'असंभव' नावाचा हा चित्रपट २१ नोव्हेंबरला रिलीज होत असून, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टर आणि टीझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
'आम्ही दोघी'मध्ये मुक्ता आणि प्रियाच्या जिव्हाळ्याच्या भावनिक नात्याची कहाणी प्रेक्षकांनी पाहिली होती. पण, 'असंभव'मध्ये त्यांचे नाते पूर्णपणे वेगळ्या परिस्थितीत, गूढता आणि थराराने व्यापलेले असणार आहे. त्यामुळे, एकाच वेळी दोन अभिनेत्रींची केमिस्ट्री आणि सस्पेन्स, ही चित्रपटाची खासियत असणार आहे.
'आम्ही दोघी' नंतर प्रिया-मुक्ताची जोडी पुन्हा गाजवणार स्क्रीन
प्रिया बापट या अनुभवाविषयी बोलताना म्हणाली, "‘आम्ही दोघी’मधील आमचा भावनिक प्रवास खूप खास होता. 'असंभव'मध्ये आम्ही त्याच बंधातून पुन्हा भेटलो आहोत, पण यावेळी हा एक वेगळा अनुभव असेल. मुक्तासोबत काम करताना नेहमीच एक वेगळा उत्साह असतो. ती स्वतःला भूमिकेत झोकून देते आणि त्यामुळे मलाही तिच्यासोबत काम करताना अधिक ऊर्जा मिळते. यात आमच्या नात्याची नवी बाजू, अनेक प्रश्न आणि आश्चर्याचे क्षण अनुभवायला मिळतील."
advertisement
मुक्ता बर्वेनेही प्रिया बापटसोबत काम करण्याचा आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, "प्रियासोबत काम करणं नेहमीच खूप आनंदाचं असतं. तिच्यासोबत संवाद साधणं खूप सोपं जातं आणि आमच्यात असलेला विश्वास आपोआप वाढतो. ‘आम्ही दोघी’मध्ये आम्ही नात्याची ऊब अनुभवली होती, पण 'असंभव'मध्ये त्या नात्याभोवती थरार, रहस्य आणि भीतीचं वलय आहे. त्यामुळेच काम अधिक रोमांचक झालं आहे. प्रेक्षकांसाठी हा चित्रपट एक अविस्मरणीय अनुभव ठरेल."
advertisement
advertisement
नव्या निर्मात्यांचे पहिले पाऊल
'असंभव'चे दिग्दर्शन सचित पाटील यांनी केले आहे, तर पुष्कर सुधाकर श्रोत्री यांनी सहदिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य यांनी मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट या बॅनरखाली निर्मिती क्षेत्रात एकत्र पाऊल टाकले आहे. या चित्रपटाच्या निर्मितीत शर्मिष्ठा राऊत आणि मंगेश परुळेकर-संजय पोतदार यांचाही सहभाग आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 02, 2025 9:21 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
सस्पेन्सचा डबल डोस, 'आम्ही दोघी' नंतर मुक्ता बर्वे आणि प्रिया बापटची जोडी पुन्हा पडद्यावर, 'असंभव'मध्ये रंगणार थरार


