Aishwarya Rai : हृदय जिंकलं! पॅरिसमध्ये रडणाऱ्या चाहतीचे ऐश्वर्याने स्वतः पुसले अश्रू; पाहा VIDEO
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Aishwarya Rai : बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या पॅरिसमध्ये आहे. तिची मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत ती पॅरिस फॅशन वीकसाठी पोहोचली.
मुंबई : बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या पॅरिसमध्ये आहे. तिची मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत ती पॅरिस फॅशन वीकसाठी पोहोचली. येथे होणाऱ्या ले डेफिले लॉरियल पॅरिस शोमध्ये ती रॅम्प वॉक करणार आहे. अशातच तिचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये तिची चाहती तिच्यासाठी रडत आहे. मात्र ऐश्वर्याने ज्या प्रकारे ही परिस्थिती सांभाळली तिचं कौतुक होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय की, ऐश्वर्या मुलीसोबत इमारतीतून बाहेर येते आणि एक महिला चाहती तिला पाहून रडायला लागते. त्या चाहत्याची अवस्था पाहून ऐश्वर्या लगेच तिला मिठी मारते, तिचे अश्रू पुसते आणि तिचं म्हणणं शांतपणे ऐकते. यानंतर, तिने त्या चाहत्याला कॅमेऱ्यासमोर पोजही दिले.
advertisement
चाहत्यांनी सोशल मीडियावर तिच्या या नम्र स्वभावाचं भरभरून कौतुक केलं. कुणी म्हणालं, "ती फक्त सुंदर नाही तर एक दयाळू पण आहे," तर कुणी म्हणालं, "क्वीन म्हणजे हीच."
advertisement
दरम्यान, या शोमध्ये ऐश्वर्यासोबत इवा लोंगोरिया, जेन फोंडा, केंडल जेनर, व्हायोला डेव्हिस, हेलेन मिरेन यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्टार्सही सहभागी होणार आहेत. ऐश्वर्या राय बच्चन L'Oreal Paris ची ग्लोबल ब्रँड अँम्बेसेडर (Global Brand Ambassador) आहेत. या ब्रँडचा 'Le Défilé' नावाचा एक भव्य फॅशन शो पॅरिस फॅशन वीक दरम्यान होतो, ज्यात ती रॅम्प वॉक (Ramp Walk) करणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2025 4:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Aishwarya Rai : हृदय जिंकलं! पॅरिसमध्ये रडणाऱ्या चाहतीचे ऐश्वर्याने स्वतः पुसले अश्रू; पाहा VIDEO