Guess Who: नजरेत धार, लांब पांढरे केस, 'छावा' चा सुपरस्टार नव्या भूमिकेत; तुम्ही ओळखलंत का?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Guess Who: छावातील सुपरस्टार शुक्राचार्यच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या या लेटेस्ट लूकमधून त्याला ओळखणं कठिण आहे.
मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांचा आगामी चित्रपट 'महाकाली' सध्या चर्चेत आला आहे. नुकताच या चित्रपटातील महत्त्वाचा पात्र 'शुक्राचार्य'चा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. हा लूक पाहून तुम्ही अवाक् व्हाल. छावातील सुपरस्टार शुक्राचार्यच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या या लेटेस्ट लूकमधून त्याला ओळखणं कठिण आहे.
छावातील सुपरस्टार शुक्राचार्यच्या भूमिकेत दिसणारा हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा दमदार अक्षय खन्ना आहे. त्याचा हा गूढ अवतार पाहून चाहते थक्क झाले आहेत.
पोस्टरमध्ये अक्षय खन्ना लांब पांढऱ्या केसांसह, पांढऱ्या डोळ्याने, दाढी व कपाळावर टिळक अशा वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे. त्याच्याभोवती अंधाराचे वातावरण दाखवले गेले आहे, ज्यामुळे त्याचा धोकादायक अंदाज अधिक प्रभावी वाटतो.
advertisement
चित्रपटात 'शुक्राचार्य' हा राक्षसांचा गुरू मानला जातो. त्यामुळे या पात्राची ताकद, बुद्धीमत्ता आणि गूढता पडद्यावर मोठ्या प्रमाणात दिसणार असल्याची अपेक्षा आहे. हा पहिलाच प्रसंग असेल, जेव्हा अक्षय खन्ना गुरूच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी अक्षय खन्ना "छावा" चित्रपटातील औरंगजेबाच्या भूमिकेमुळे चर्चेत आला होता. त्याचा नकारात्मक अंदाज प्रेक्षकांना खूप भावला. आता अक्षय खन्नाच्या या नव्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.
advertisement
In the shadows of gods,
rose the brightest flame of rebellion 🔥
Presenting The Enigmatic #AkshayeKhanna as the eternal 'Asuraguru SHUKRACHARYA' from #Mahakali 🔱❤️🔥@PrasanthVarma @RKDStudios #RKDuggal @PujaKolluru #RiwazRameshDuggal @ThePVCU pic.twitter.com/IWjP5JOh5r
— RKD Studios (@RKDStudios) September 30, 2025
advertisement
"महाकाली" या चित्रपटाबद्दल अजून पूर्ण माहिती समोर आलेली नाही. अक्षय खन्ना व्यतिरिक्त इतर कलाकार कोण असतील, हे लवकरच कळणार आहे. पण पोस्टर पाहून इतके निश्चित झाले आहे की प्रशांत वर्मा पुन्हा एकदा भव्य आणि वेगळा सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी सज्ज आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 30, 2025 6:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Guess Who: नजरेत धार, लांब पांढरे केस, 'छावा' चा सुपरस्टार नव्या भूमिकेत; तुम्ही ओळखलंत का?